कोविड सेंटरच्या उभारणीत महापौरांकडून भ्रष्टाचार, मनसेचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोविड सेंटरच्या उभारणीत महापौरांकडून भ्रष्टाचार, मनसेचा आरोप

मुंबई – कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेने केला असून हा भ्रष्टाचार खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

कोविड सेंटरच्या उभारणीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या मुलालाच कंत्राट दिलं होतं, असा आरोप देशपांडे यांनी केला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, ‘कोरोना संकटाच्या काळात कुणीही राजकारण करू नये. सर्वांना या संकटाशी एकजुटीनं लढायचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत होते. इतर पक्षही त्यावेळी कोरोनाच्या संकटाळी लढण्यात व लॉकडाऊनमुळं अडचणी आलेल्या जनतेला धीर देण्याच्या कामात व्यग्र होते. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना त्यावेळी भ्रष्टाचार करण्यात गुंतली होती असं आमच्या निदर्शनास आलं आहे. ‘महापौर पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीनं गैरमार्गानं काम मिळवल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. ‘दुसऱ्या तिसऱ्या कोणाला काम न देता परस्पर एखाद्याला बोलावून अॅग्रीमेंट केलं जातं यातच सर्व काही आलं,’ असं देशपांडे म्हणाले.


महापालिकेचा हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सभागृहही चालू दिले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना केवळ मुंबई महापालिकेचेच सभागृह बंद का,’ असा प्रश्नही देशपांडे यांनी केला. ‘या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही देशपांडे यांनी केली. पुत्र मोहातून शिवसेना बाहेर पडेल का, असं ट्वीटही देशपांडे यांनी केलं आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोविड सेंटरच्या उभारणीत महापौरांकडून भ्रष्टाचार, मनसेचा आरोप

मुंबई – कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेने केला असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच, आजचा भाव पाहा

मुंबई – जागतिक लॉकडाऊनमुळे कमॉ़डिटी बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतोय. ५६ हजाराच्या जवळपास गेलेल्या सोन्याची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली

आजमगड – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ताफा अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी जागेवरच...
Read More
post-image
देश महाराष्ट्र मुंबई

शेअर बाजारातील ३ दिवसांच्या तेजीला लागला मंदीचा ब्रेक

मुंबई – जागतिक बाजारातून आलेल्या संमिश्र प्रतिसादामुळे ३ दिवस तेजीत असलेल्या मुंबई शेअर बाजाराला आज मंदीचा ब्रेक लागला. त्यामुळे सकाळी निर्देशांकात ३०० तर निफ्टीत...
Read More
post-image
महाराष्ट्र

खारघरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

नवी मुंबई – ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपी महम्मद सुलेमान याने खारघरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. अद्याप सुलेमानच्या...
Read More