मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यात आल्याने निलेश राणे आणखी सक्रीय झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदम्यान आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. तसंच आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री तपासात गडबड करु शकतात अशी शक्यताही व्यक्त केली आहे. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव मर्डर मिस्ट्रीममध्ये आलं आहे. सुप्रीम कोर्टात संशयितांमध्ये त्यांचं नाव रेकॉर्डवर आलं आहे. हे तितकंच गंभीर आहे. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी तर दिलाच पाहिजे. मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री तपासात गडबड करु शकतात,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.


याआधी निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण या केसमध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन

पुणे – पंढरपूरचे ५ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करणारे दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात काल रात्री साडे अकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ७५३, पुण्यात १,८२९ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांच्या पार

मुंबई – महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ८ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले. तर २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच ११ हजार ३९१ जणांनी कोरोनावर यशस्वी...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More