भगतसिंग दहशतवादी-जम्मू काश्मीरच्या प्राध्यापकांची शिकवण – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

भगतसिंग दहशतवादी-जम्मू काश्मीरच्या प्राध्यापकांची शिकवण

जम्मू काश्मीर – जम्मू विद्दापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक तजुद्दिन यांनी विध्यार्थांना शिकवताना ‘भगतसिंग दहशतवादी होते’ असा उल्लेख केला होता. त्यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने, विद्यापीठातील तरुणांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भारताला स्वातंत्र मिळण्यामागे भगतसिंग यांनी सगळ्यात मोठे योगदान दिले होते आणि त्यांच्याबद्दल अपरिहार्य वक्तव्य केले जाते, त्यामुळे विद्यापीठातील तरुणांनी प्राध्यापकांविरोधात निदर्शने केली आहेत.


राज्यशास्त्राचे प्राध्यापक तजुद्दिन हे भगतसिंग यांच्यावर पाठ शिकवत असताना त्यांनी ‘भगतसिंग दहशतवादी होते’ असा उल्लेख असतानाचा एक अर्धवट व्हिडीओ विद्यापीठातील तरुणांमध्ये व्हायरल झाल्याने प्राध्यापकांना काढण्यासाठी निदर्शने करण्यात आली, विध्यार्थ्यांचा रोष लक्षात घेऊन कुलगुरूंनी तातडीने प्राध्यापकांवर कारवाई करत निलंबन केले आणि या प्रकाराची तपासणी करण्यासाठी समिती नेमली असून त्यासंदर्भात चौकशी पुर्ण होणार नाही, तोपर्यंत तजुद्दिन यांना निलंबित केले आहे.

या प्रकरणावरती प्राध्यापक तजुद्दिन यांनी स्पष्टीकरण दिले आहे, ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भगतसिंग यांच्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार मी विध्यार्थ्यांना त्यांचे जीवन, शासक आणि कायद्यांबद्दल सांगत होतो, भारतातील नागरिकांसाठी भगतसिंग हे जरी क्रांतीकारी असले तरी शासनकर्ते त्यांना दहशतवादी मानायचे असा उल्लेख माझ्या शिकवणीत केला होता, पण त्याबद्दल अर्धवट व्हिडीओ बनवून मला बदनाम केले जात असल्याची माहिती प्राध्यापक तजुद्दिन यांनी पत्रकारांना दिली.

विद्यापीठातील तरुणांनी याविरूध्द आवाज उठवूण निदर्शने केली, त्यामुळे कुलगुरूंनी प्राध्यापकांना तातडीने चौकशी पुर्ण होईपर्यंत निलंबीत केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More