नवी दिल्ली – अभिनेते, राजकारण यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आयपीएलपूर्वीच एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जातेय. त्यामुळे या खेळाडूला आता कोरोनाच्या तीन चाचण्या कराव्या लागणार आहेत.
आयपीएलमधअये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असलेला करूण नायर या खेळाडूला कोरोनाची लागण झाली. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्येही त्याने त्रिशत झळकावले आहेत. त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सध्या तो क्वांरटाइन आहे.
काही दिवसांपूर्वी करुणला कोरोना झाला होता. पण आता त्याची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले जात आहे. आठ ऑगस्टला करुणची कोरोना चाचणी करण्यात आली होती. करुणची ही चाचणी निगेटीव्ह आली होती. त्यामुळे आता आयपीएल खेळण्यासाठी करुण उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. पण आयपीएल खेळण्यासाठी करुणला आता तीन कोरोनाच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. या तिन्ही चाचण्यांमध्ये करुण निगेटीव्ह आढळला तरच त्याला आयपीएल खेळण्यासाठी युएईला जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.