मॅटवर मातीचा विजय; ‘बाला रफिक शेख’ झाला महाराष्ट्र केसरी – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

मॅटवर मातीचा विजय; ‘बाला रफिक शेख’ झाला महाराष्ट्र केसरी

जालना – जालना येथील आझाद मैदानावर संपन्न झालेल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेत्या पुण्याच्या अभिजीत कटकेला पराभूत करून मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. हा किताब पटकावणारा बाला विदर्भातील पहिला पहिलवान ठरला आहे.

विशेष म्हणजे या स्पर्धेत कुस्ती विभागात अव्वल क्रमांक पटकावून बालाने किताबाच्या लढतीत प्रवेश केला होता. तर मॅट विभागात कटकेने बाजी मारून किताबाच्या लढतीची अंतिम फेरी गाठली. या अंतिम सामन्यापूर्वी कटकेचेच पारडे जड होते. तोच यंदादेखील दुसर्‍यांदा किताब जिंकणार अशीच चर्चा कुस्ती वर्तुळातदेखील होती. पण किताबाच्या अंतिम लढतीत बालाने कटकेला 11-3 गुणांनी सहज नमवून या स्पर्धेत मोठ्याच धक्कादायक निकालाची नोंद केली. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याचे कटकेचे स्वप्न भंग पावले. निर्णायक लढतीत सुरुवातीला कटकेने आक्रमक खेळ करून सामन्यातून पहिला गुणदेखील वसूल केला. पण त्यानंतर बालाने स्वत:ला सावरले आणि आक्रमक खेळ करून कटकेवर डाव उलटवला. त्याने पहिल्याच मिनिटाला 2 महत्त्वाचे गुण वसूल केले.

मग त्यानंतर त्याने गुणांची आघाडी वाढवून आपले जेतेपद निश्‍चित केले विश्रांतीला बालाने 3-1 गुणांची आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर त्यात आणखी 8 गुणांची भर टाकून बालाने अभिजीतला कुस्तीत कमबॅक करू दिले नाही. खास करून बालाने एकेरी पट काढून जास्तीत जास्त गुण वसूल केले. अंतिम फेरीची लढत रंगतदार न झाल्यामुळे मैदानात गर्दी करणार्‍या हजारो कुस्तीप्रेमींची मात्र काहीशी निराशाच झाली. विजेत्या बालाला 2 लाख रुपये आणि चांदीची गदा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि स्पर्धेचे प्रमुख संयोजक ना. अर्जुन खोतकर यांच्याहस्ते देण्यात आले.
बालाने आपला विजय स्व. गणपतराव आंदळकर यांना समर्पित केला. कारण सुरुवातीला बालाला घडविण्यात आंदळकर यांचा मोठा वाटा होता. बालाच्या या जबरदस्त कामगिरीमुळे त्याचे कुटुंब कमालीचे खूश झाले. त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. पुण्याच्या ज्या हनुमान आखाड्यात बाला सराव करतो तेथे दिवाळी साजरी करण्यात आली. आता बालाचे लक्ष मानाच्या हिंद केसरी किताबाकडे आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून बालाने मिळविलेले हे यश निश्‍चितच कौतुकास्पद आहे. कुस्तीचा वसा त्याने आपल्या वडिलांकडून घेतला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More