बकरी ईदनिमित्त सरकारच्या सूचना जारी, सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करता येणार नाही! – eNavakal
Uncategoriz

बकरी ईदनिमित्त सरकारच्या सूचना जारी, सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करता येणार नाही!

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा, गर्दी करू नका, असं आवाहन करतानाच बकरी ईदच्या दिवशी कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नसल्याचं आणि करोनाचा प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई करण्यात आल्याचं राज्य सरकारने आज स्पष्ट केलं. तसेच बकरी ईदच्या निमित्त शासनाने सहा मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीत करोना पार्श्वभूमीवर या वर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरले. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन सर्व संबंधितांनी करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

  • मार्गदर्शक सूचना

    कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यानुसार बकरी ईदची नमाज मशीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

  • सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
    नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
  • बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.
  • कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

    दरम्यान, ‘सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे करोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी’, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात अधूनमधून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी सातही...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा तपासणी अहवाल आज मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मित्तल यांची काल रॅपिड टेस्ट...
Read More
post-image
मुंबई

जुहूमधील बिल्डरची घरासमोरच धारदार शस्त्राने वार करून हत्या

मुंबई – मुंबईतील पुनर्वसन प्रकल्पातून निर्माण झालेल्या वादातून जुहूमधील बिल्डर अब्दुल मुनाफ शेख (५५) यांची घरासमोरच धारदार शस्त्राने डोक्यावर, पोटावर आणि छातीवर वार करून...
Read More
post-image
देश राजकीय

प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही! आर्मी रुग्णालयाची माहिती

मुंबई – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष असल्याची माहिती दिल्लीच्या आर्मी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संघर्ष हा माझा सोबतीच आहे! मात्र संघर्षात सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मन अस्वस्थ होते!

मुंबई – मनसेच्या नांदेड येथील सुनील ईरावार या पदाधिकार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली व त्याने सुसाईड नोटमध्ये राज ठाकरेंना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करताना राज...
Read More