मनसे नेते अविनाश जाधव न्यायलायत हजर, शेकडो कार्यकर्ते जमले – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनसे नेते अविनाश जाधव न्यायलायत हजर, शेकडो कार्यकर्ते जमले

ठाणे – वसई महानगरपालिकेत आंदोलन केल्याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना तडीपारीचीी नोटीस बजावण्यात आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर मनसे नेते आणि कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहे.  “अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया”, असं आव्हान मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलंय. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी शेकडो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, “अविनाश जाधव यांना काल तडीपारीची नोटीस तर दिलीच, पण त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे”.


सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करुन आम्हाला गप्प बसवता येईल असं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असं म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार” असं देशपांडे म्हणाले.

आज आम्ही सर्वजण अविनाश जाधवच्या समर्थनार्थ ठाण्याला जातोय. आम्ही सर्वजण अविनाशच्या पाठिशी आहोत, आम्हाला कोण अडवतंय ते बघायचं आहे, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी दिलं.


ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही.कोव्हिडसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी आंदोलन केले. आकासापोटी ही कारवाई करण्यात आलेली आहे, असं मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. आज गणेश उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची बुकिंग मनसेच्यावतीने सुरु करण्यात आली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २३ हजारांचा टप्पा, आज ३६८ नव्या रुग्णांची नोंद

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी २३ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज ३६८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून २३२ जणांना गेल्या २४...
Read More
post-image
मनोरंजन

करिना पुन्हा आई बनणार, गुड न्यूजच्या बातमीवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मुंबई – अभिनेत्री करीना कपूर पुन्हा आई बनणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच, या गुड न्यूज बाबत खुद्द सैफ आणि करिनाने सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यात आल्याने निलेश राणे आणखी सक्रीय झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदम्यान आदित्य...
Read More
post-image
मुंबई

मुंबई पालिकेच्या अभय योजनेची मुदत वाढवली

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी केले, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई -राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या...
Read More