…तर मी सचिन पायलट यांचं स्वागतच करेन, गेहलोत यांनी दिली नवी ऑफर – eNavakal
देश

…तर मी सचिन पायलट यांचं स्वागतच करेन, गेहलोत यांनी दिली नवी ऑफर

राजस्थानमधील सत्ता नाट्य अद्यापही संपलेलं नसून हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. त्यातच अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना सरकारमध्ये येण्याची नवी ऑफर नवी दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या मुलाखती दरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गेहलोत यांनी पायलट यांचं पुन्हा स्वागत करू असं म्हटलं आहे. राजस्थानमधील संकटाने तुमच्या सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, हे सरकार किती स्थिर आहे, असा प्रश्न गेहलोत यांना विचारण्यात आला. उत्तर देताना गेहलोत म्हणाले,”राज्य सरकारच्या कोणत्याही कामामुळे हे संकट निर्माण झालेलं नाही. हे राजकीय संकट अतिमहत्त्वकांक्षी असलेल्या सचिन पायलट व पक्षातील आमदारांच्या छोट्या गटानं जे भाजपाच्या हातातील बाहुले बनले आहेत, त्यांनी उभं केलं आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकारकडे पुरेस बहुमत आहे. लोकांच्या पाठिंब्याचाही आम्हाला आनंद आहे. आमचं सरकार पूर्णपणे स्थिर असून, कालावधी पूर्ण करेल,” असं गेहलोत म्हणाले.

“सचिन पायलट काँग्रेसमध्ये परतल्यास त्यांना सरकारमध्ये आणि राज्याच्या राजकारणात स्थान असेल का?”, या प्रश्नावर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले,”हे सगळं भविष्यातील घडामोडींवर अवलंबून आहे. भविष्यात पायलट कोणता निर्णय घेतात आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्या काय ठरवते, यावर अवलंबून असेल. जर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास टाकण्याचा निर्णय घेतला, तर मी त्यांचं स्वागत करेन,” असं सांगत गेहलोत यांनी अप्रत्यक्षरीत्या पायलट यांना परतण्याचे संकेत दिले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...
Read More