३५ लाख स्थलांतरीत मूळगावी परतले, आणखी २६०० ट्रेन श्रमिकांसाठी धावणार- रेल्वे मंत्रालय – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

३५ लाख स्थलांतरीत मूळगावी परतले, आणखी २६०० ट्रेन श्रमिकांसाठी धावणार- रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली – देशात ४ कोटीपेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतर करतात. या मजुरांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रोज २०० रेल्वेगाड्या धावत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या स्थलांतरीतांचे समुपदेशन करून त्यांना श्रमिक ट्रेनने (Shramik Special Train) जाण्याची विनंती करावी अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत, आतापर्यंत २६०० पेक्षा जास्त रेल्वेच्या फेऱ्या झाल्या असून त्यातून ३५ लाख स्थलांतरीत (Migrant) आपल्या गावी पोहोचले आहेत. तर आणखी २६०० ट्रेन धावणार असल्याची माहिती आज केंद्रीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाकडून आज संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.

वाचा – कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत, बिहार सरकारची घोषणा

१ मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या. आतापर्यंत २६०० ट्रेन सोडण्यात आल्या असून त्यातून ३५ लाख स्थलांतरीत आपल्या गावी रवाना झाले आहेत. या प्रवासात पाणी आणि जेवणाची मोफत सुविधा देण्यात आली आहे. प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातात. राज्यांकडून प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग केली जात असून ज्यांना कोणतीही लक्षणं नाहीत, त्यांनाच प्रवासाची मुभा दिली जात आहे. तसेच, आतापर्यंत ८० टक्के ट्रेन उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी सोडण्यात आल्या आहेत.

१ मे रोजी ४ ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. मात्र आता दिवसाला २५५ ट्रेन चालवण्यात येत आहेत. दिल्लीत अडकलेल्या लोकांसाठीही १२ मेपासून विशेष ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. देशभरातील विशेष १५ शहरांत जाण्यासाठी या ट्रेन चालवण्यात येत आहेत.

वाचा –सिग्नल बिघाडामुळे २० श्रमिक स्पेशल रेल्वे रखडल्या, मजुरांचे हाल

तर, १ जूनपासून आणखी २०० रेल्वे सोडण्यात येणार आहेत. यासाठी २१ मेपासून तिकिट बुकिंग सुविधा सुरू झाली आहे. ऑनलाईन, पीआरएस, कॉमन सर्व्हिस सेंटर, पोस्ट  ऑफिस आणि एजंट यांच्याकडून तिकिट बुक करता येणार आहे. प्रवासाच्या आधी प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. कोणतीही लक्षण न दिसल्यासच त्यांना प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. प्रवासात फक्त पॅकबंद खाद्यपदार्थ विकण्यात येणार आहेत. या प्रवासात कोणताही विनाआरक्षित डबा नसणार, वेटींग लिस्टमधील प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी माहिती देण्यात आली.

वाचा – धक्कादायक! हैदराबादमध्ये एकाच विहिरीत आढळले 9 मृतदेह

रेल्वेच्या ५ हजार कोचेसचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. यामुळे ८० हजार खाटांची सुविधा झाली आहे. सध्या यातील ५० टक्के कोच वापरात नसल्याने त्यांचा उपयोग श्रमिक ट्रेनसाठी करण्यात येत आहे. जर, गरज भासल्यास त्यांचा वापर पुन्हा कोविड सेंटरसाठी करण्यात येईल, असंही यादव यांनी सांगितलं.


जिथे गरज असेल तिथून ट्रेन सोडण्यात येणार आहेत. राज्यांनी मागणी केली तर आणखी ट्रेन सोडणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले. तसेच, रस्त्यांवरून पायी चालत जाणाऱ्या मजुरांचं समुपदेशन करावं, त्यांना मोफत राहण्याची आणि खाण्याची सुविधा करून द्यावी, अशा सुचनाही राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना करण्यात आल्या असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More