वाढदिवस विशेष : घराघरात हास्याची लाट घेऊन येणारे डॉ. निलेश साबळे – eNavakal
दिनविशेष

वाढदिवस विशेष : घराघरात हास्याची लाट घेऊन येणारे डॉ. निलेश साबळे

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ’ द्या या कायक्रमाच्या माध्यमातून हास्याची लाट घराघरात पोहोचवणारे अभिनेते, दिग्दर्शक, सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्या आजवरच्या प्रवासावर थोडक्यात प्रकाश टाकू.

डॉ. निलेश साबळे यांचा जन्म.३० जुन १९८६ रोजी सासवड येथे झाला. निलेश साबळे यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथे झाले. निलेश साबळे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याच्या घरातील कोणालाही अभिनयाची पार्श्वलभूमी नाही, तरीही या क्षेत्रात जिद्दीनं उतरायचं आणि यशस्वी व्हायचं हा ध्यास कायम मनी बाळगलेला. घरातून, “आधी शिक्षण आणि मग इतर’ अशी सक्त ताकीद असल्याने बीएएमएस (आयुर्वेद) ही डॉक्टरकीची पदवी चांगल्या गुणांनी मिळविली. वाशी येथे काही काळ नोकरी केली. गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना एकपात्री प्रयोग केले. अभिनयाची खरी सुरवात बारावीत असताना “हसरी फसवणूक’ या एकपात्रीपासून झाली.

भोर येथील राजगड ग्रुपमधील सहकाऱ्यांसह प्रकाश मोरे, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, राकेश सारंग यांचे मार्गदर्शन मिळाले. अवधूत गुप्ते, मिलिंद गुणाजी यांच्यासमवेत कार्यक्रम केले. “हास्यसम्राट’मध्ये पाहुणा कलाकार, ई-मराठीवरील “नान्याच्या गावाला जाऊ या’ या मालिकेत काम केले. शिक्षण घेत असताना एकपात्री, मिमिक्रीच्या माध्यमातून स्वतःतील कलाकार कायम जिवंत ठेवला. ते स्वत: चांगले गातात, दिग्दर्शन करू शकतात, चित्रकार काढतात, अभिनया व्यतिरिक्तच्या या गोष्टी फारच कमी लोकांना माहीत आहेत. “महाराष्ट्राचा सुपरस्टार’, “फू बाई फू’, “होम मिनिस्टर’, “दुभंग’ (मराठी चित्रपट) आणि चला.. हवा येऊ द्या”असा त्यांचा प्रवास आहे. संजीव वेलणकर पुणे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More