‘अमित ठाकरें’चा शाही लग्नसोहळा – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

‘अमित ठाकरें’चा शाही लग्नसोहळा

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे आज लग्नबंधनात अडकले आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे मिताली बोरूडे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकले आहेत. लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे आज दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचा शानदार विवाह सोहळा संपन्न झाला.

‘राज’पुत्राच्या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, उद्योगपती रतन टाटा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जयदेव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, प्रसिद्ध गायिका आशा भोसले, अभिनेता अमिर खान, रितेश देशमुख, अमित देशमुख, साजिद खान, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित आहेत.

अमित आणि  मिताली यांचा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा पार पडला होता. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. या विवाह सोहळ्यास राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी काल अमितचा हळदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. वरमाय अर्थात राज ठाकरे यांच्या पत्नी पारंपरिकरित्या नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवरीकडे नेताना दिसल्या.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More