विशेष विवाह कायद्यात ३० दिवसांच्या पूर्व नोटीसीची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय – eNavakal
देश

विशेष विवाह कायद्यात ३० दिवसांच्या पूर्व नोटीसीची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

अलाहाबाद  – विशेष विवाह कायद्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने सर्वात मोठी सुधारणा केली आहे. कोर्टाने यासंदर्भात आदेश देताना विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न करणाऱ्या दाम्पत्याला ३० दिवसांच्या पूर्व नोटीसीची गरज नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता विशेष विवाह कायद्यातील ही तरतुद संपुष्टात आली आहे. एका दाम्पत्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

साफिया सुल्ताना नामक एका मुलीनं धर्मांतर करुन एका हिंदू मुलाशी लग्न केलं आहे. मुलीचे कुटुंबीय सुरुवातीला या लग्नाच्या विरोधात होते त्यामुळे त्यांनी मुलीला आपल्या घरात अवैध पद्धतीने डांबून ठेवलं होतं. दरम्यान, मुलाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल करत न्यायाची मागणी केली होती. यानंतर कोर्टाने मुलगी आणि तिच्या वडिलांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले.

कोर्टात हजर झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, ते सुरुवातीला या लग्नाच्याविरोधात होते मात्र, आता त्यांना यावर काहीही आक्षेप नाही. सुनावणीदरम्यान मुलीने कोर्टासमोर आपली समस्या मांडताना सांगितलं की, तिने विशेष विवाह कायद्यांतर्गत यासाठी लग्न केलं नाही कारण या कायद्यांत लग्नानंतर ३० दिवसांचा नोटीस पिरियड जाहीर करण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार, जर या काळात कोणाला या विवाहावर आक्षेप असेल तर त्या आक्षेपाची दखल घेतली जाते.

मुलीने सांगितलं की, या तरतुदीमुळे लोक नेहमी मंदिरं किंवा मशीदींमध्ये जाऊन लग्न करतात. कोर्टाने मुलीच्या या तर्काची दखल घेतली विशेष विवाह कायद्यातील कलम ६ आणि ७ मध्ये सुधारणा सुचवत निर्णय दिला की, आता यांसारख्या नियमांची गरज नाही, असे नियम व्यक्तीच्या गोपनीयतेच्या हक्काचं उल्लंघन करतात. न्या. विवेक चौधरी म्हणाले, जर विशेष विवाह कयद्यांतर्गत लग्न करण्यास दाम्पत्य इच्छुक नसेल तर यावर नोटीसीद्वारे बाधा आणली जाऊ शकत नाही. कोर्टाच्या या आदेशाच्या प्रती रजिस्ट्रार आणि इतर न्यायालयीन अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

विशेष विवाह कायद्यात ३० दिवसांच्या पूर्व नोटीसीची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

अलाहाबाद  – विशेष विवाह कायद्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने सर्वात मोठी सुधारणा केली आहे. कोर्टाने यासंदर्भात आदेश देताना विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न करणाऱ्या दाम्पत्याला ३० दिवसांच्या पूर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

सोनू सूदच्या अवैध बांधकामप्रकरणी हायकोर्टानं राखून ठेवला निकाल

मुंबई – अभिनेता सोनू सुदला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. अवैध बांधकामप्रकरणी त्याला नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे त्याने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली...
Read More
post-image
महाराष्ट्र

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

मुंबई – नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोरोनाबाधित मतदारांसाठी निवडणूक आयोगानं आणली नवी सुविधा

मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांना ग्रामपंचयात निवडणुकीत मतदान करता येणार का? हा प्रश्न सर्वांसमोर होता. राज्य निवडणूक आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कोरोनाबाधित आणि विलगीकरण...
Read More