उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा – eNavakal
महाराष्ट्र मुंबई राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा

मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर कुणीही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करु नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा येत्या २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. कोरोना संकटामुळे हा वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बांधवांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित करु नये. भेटीगाठी टाळाव्यात. त्याऐवजी आपली शक्ती कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी वापरावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या, पाठिराख्यांच्या, हितचिंतकांच्या, राज्यातील तमाम जनतेच्या शुभेच्छा माझ्यासाठी निश्चितंच खूप मोलाच्या आहेत. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. कृपया त्या शुभेच्छा ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स्‌ॲप, ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे अवश्य पाठवाव्यात. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावयाचे असल्यामुळे, तुमच्या स्वत:च्या, तुमच्या कुटुंबाच्या, आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी कुणीही घराबाहेर पडू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये अपघात, विमानाचे दोन तुकडे

कोझीकोड – केरळमधील एअर इंडियाचं विमान लँडिंग करताना अपघात घडला आहे. लँडींग होत असताना धावपट्टीवरून विमान घसरलं. या विमानात १९१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुबईहून...
Read More
post-image
मनोरंजन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेली श्रुती मोदी नक्की कोण?

मुंबई – सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनव्या लोकांची नावे समोर येत आहेत. त्यातच काल सीबीआयने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यात श्रुती मोदी सध्या बरीच...
Read More
post-image
महाराष्ट्र

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश विदेश

गुड न्यूज! भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 300 मृत्यू

मुंबई – राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १०...
Read More