दर्शनासाठी निघालेली बोट ४५ प्रवाशांसह उलटली, तिघांचे मृतदेह सापडले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

दर्शनासाठी निघालेली बोट ४५ प्रवाशांसह उलटली, तिघांचे मृतदेह सापडले

कोटा – ४५ प्रवाशांना घेऊन कमलेश्वर धाम दर्शनासाठी निघालेली बोट राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीत उलटली आहे. या बोटीत पुरुषांसह महिला आणि लहान मुलंही होती. दरम्यान,  बचाव पथकाने आतापर्यंत २० जणांना सुरक्षित बाहेर काढलं असून तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अपघाताचं गांभीर्य पाहता पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात खातौली परिसरात आज (16 सप्टेंबर) सकाळीच गोठडा कला गावाजवळ घडला. अपघातामधील प्रवासी कमलेश्वर धाम दर्शनासाठी जात होते. याचवेळी अचानक नाव उलटली आणि सगळे पाण्यात बुडाले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि मदत-बचाव दला घटनास्थळी पोहोचले आहे. पाण्यात बुडालेल्या प्रवाशांच्या शोधासाठी बचाव कार्य सुरु आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार आज चतुर्दशीचा दिवस आहे. यामुळे कोटा जिल्ह्याच्या गोठडा गावातून चंबळ नदीच्या एका किनाऱ्यावरुन काही भाविक दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या बुंदी जिल्ह्यातील कमलेश्वर धाम दर्शन आणि स्नानासाठी जात होते. यावेळी एकानेही लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. बोट नदीत जाताच अचानक बोट उलटली आणि एकच गोंधळ झाला.

मृतांच्या नातेवाईकांना एक लाखांची नुकसानभरपाई
दरम्यान, या घटनेवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो असं सांगून त्यांनी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोनामुक्त झाल्यावर होम क्वारंटाइन असलेल्या इसमाने केली आत्महत्या

पुणे – एकीकडे पुण्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असतानाच रुग्णांमध्ये नैराश्येचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या एका इसमाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दर्शनासाठी निघालेली बोट ४५ प्रवाशांसह उलटली, तिघांचे मृतदेह सापडले

कोटा – ४५ प्रवाशांना घेऊन कमलेश्वर धाम दर्शनासाठी निघालेली बोट राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीत उलटली आहे. या बोटीत पुरुषांसह महिला आणि लहान मुलंही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपुरात हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

नागपूर – नागपूरमध्ये कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी महानगरपालिकेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यावर अद्यापही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागपुरात आधी हजार खाटांचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ म्हणत जितेंद्र आव्हाडांना पुन्हा भेटला जुना राजकीय मित्र

ठाणे – ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीमुळे दोन जुने राजकारण मित्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.  शिवसेनेचे आमदार प्रताम सरनाईक आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उदयनराजेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, मेटेंची मागणी

बीड – मराठा आरक्षणप्रकरणी सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक...
Read More