पाहाः सुषमा स्वराज यांचं संयुक्त राष्ट्र संघातील भाषण – eNavakal
News राजकीय

पाहाः सुषमा स्वराज यांचं संयुक्त राष्ट्र संघातील भाषण

राजकारणात धक्कातंत्राचा अचूक वापर करून विरोधकांना चारीमुंड्या चीत करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा २०१८मध्येच लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची व्यूहरचना आखत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याचा ‘फॉर्म्युला’ अवलंबत २०१८ हे वर्ष संपण्याच्याआधी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील १३ मुख्यमंत्री आणि ६ उपमुख्यमंत्र्यांची मोदी आणि शहांसोबत बैठक झाली. ही बैठक निवडणुकीच्या रणनितीचाच एक भाग होती, असेही सांगितले जात आहे.

केंद्रातील मोदी सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यास जून २०१९मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र भाजप तोपर्यंत वाट पाहण्याच्या मनस्थितीत नाही. जून २०१९पर्यंत कोणती गणितं बनतात, कोणती नवी आव्हाने उभी ठाकतात, याची वाट न पाहता त्याआधीच २०१८ हे वर्ष संपण्याआधी निवडणुकांना सामोरे जाऊन विरोधकांना धक्का दिल्यास ते फायद्याचे गणित ठरेल, असे भाजपला वाटत आहे. सत्तेतील शेवटच्या १०-१२ महिन्यांवर पाणी सोडून पुढची ५ वर्षे सत्ता मिळाल्यास ते कधीही चांगले, असेच भाजप नेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळेच तशी तयारी सरकार आणि संघटनेच्या पातळीवरही सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका २०१८मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणार आहेत. ते पाहता लोकसभा निवडणुका त्याआधी होणार असतील तर एकत्रच दोन्ही निवडणुका व्हाव्यात असा प्रयत्न भाजपचा राहणार आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिनही राज्यांत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे. ते पाहता लोकसभा निवडणुकीसोबत या राज्यांच्या निवडणुका झाल्यास स्थानिक मुद्दे गौण ठरतील आणि राष्ट्रीय मुद्द्यांच्या जोरावर या राज्यांमधील सत्ताही टिकवणे सुकर जाईल, असे भाजपमधील धुरिणांना वाटत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मोदी सरकार लवकरच सर्वसामान्यांना खूष करणाऱ्या योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यातही गरीब वर्गाला केंद्रस्थानी ठेवले जाणार आहे. ‘सुभाग्य’ ही योजना त्यातील महत्वाची योजना असेल असे अर्थ मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. या योजनेत ग्रामीण भागातील लोकांना वीजबिलात सबसिडी दिली जाणार असल्याचे कळते. गॅस सबसिडीप्रमाणेच ही सबसिडी मिळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय अन्य मंत्रालयांनाकडूनही आकर्षक योजनांबाबत तपशील मागवण्यात आला आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट.

प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईतील तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

पेनांग- मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील...
Read More