65 वर्षांवरील कलाकारांना परवानगी, अमित देशमुख यांची घोषणा – eNavakal
मनोरंजन महाराष्ट्र

65 वर्षांवरील कलाकारांना परवानगी, अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई – चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार, क्रू सदस्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.

मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी यांच्या चित्रिकरणाची कामे नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरीता मार्गदर्शक सूचना, शासन निर्णयाद्वारे 30 मे व 23 जून  अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार, क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती.

नतर उच्च न्यायालाने सदरील अट रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आता 65 वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षाही अमित देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

65 वर्षांवरील कलाकारांना परवानगी, अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई – चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार, क्रू सदस्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

पंडित जसराज यांचे पार्थिव मुंबईत दाखल, विलेपार्ले स्मशानभूमीत उद्या अंत्यसंस्कार

मुंबई – पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पद्मपुरस्कारांनी सन्मानित झालेले शास्त्रीय संगीत क्षेत्रातील विख्यात प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचे काल वयाच्या ९० व्या वर्षी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बंगळुरू – ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन (89) यांचे आज चमारजापेट येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आता जिल्ह्याबाहेरही एसटी धावणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – राज्यातील पुनश्च हरिओम अंतर्गत जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. आता गणेसोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पार्थ पवारांच्या ट्विटला विरोधकांचाही पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज याबाबत निर्णय घेतला. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे...
Read More