9 हजार रुपये चोरी प्रकरणी वारांगणेची हत्या; पळून गेलेल्या 22 वर्षीय आरोपीला अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

9 हजार रुपये चोरी प्रकरणी वारांगणेची हत्या; पळून गेलेल्या 22 वर्षीय आरोपीला अटक

मुंबई- नऊ हजार रुपये चोरी केले म्हणून एका 30 वर्षीय वारांगणेची हत्या करुन पळून गेलेल्या अब्दुल हमीद अन्सारी या 22 वर्षीय आरोपीस कुठलाही पुरावा नसताना एमआरए मार्ग पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली. त्याच्यावर अमीना अब्दुल गणी खान या वारागंणेची हत्या केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. चर्नीरोड येथील पिला हाऊस परिसरात अमीना खान ही वेश्याव्यवसाय करीत होती. रविवारी ती तिच्या मैत्रिणीसोबत सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेर उभी होती. यावेळी तिथे एक तरुण आला आणि काही कळण्यापूर्वीच त्याने अमीनाची चाकूने वार करुन हत्या केली.

या हत्येनंतर तो एका टॅ3सीतून पळून गेला होता. या घटनेनंतर एमआरए मार्ग पोलिसांनी पळून गेलेल्या आरेापीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. कुठलाही पुरावा नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी तीन विशेष पथकाची नियुेी करुन आरोपीच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्या पथकातील गुलाबराव मोरे, सुभाष दुधगांवकर, सुहास माने, रविंद्र पाटील, किरण पाटील, योगेश भोसले, पीरमोहम्मद शेख, विनोद कांबळे, विलास खाडये, कैलास भोईटे, यांनी डोंगरी परिसरातून अब्दुल हमीद अन्सारी या संशयित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच अमीनाची चाकूने भोसकून
हत्या केल्याचे उघडकीस आले होते. अब्दुल हा डोंगरीतील पाला गल्ली, गुडलक हॉटेलजवळील एका फ्रॉक बनविण्याच्या कारखान्यात टेलर म्हणून काम करीत होता. तो नेहमीच पिला हाऊस, पांडुरंग चाळीतील कुंटनखान्यात वेश्यागमनासाठी जात होता. तिथेच त्याची ओळख अमीनाशी झाली होती. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अमीनाने त्याचे नऊ हजार रुपये चोरी केले होते. त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने फुटपाथवरील हॉकर्सकडून एक धारदार चाकू खरेदी केला होता. 4 मार्चला रात्री साडेदहा वाजता तो अमीनाच्या पाठलाग करीत छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ आला. त्यानंतर त्याने काही कळण्यापूर्वीच तिची चाकूने भोसकून हत्या केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील राष्ट्रीय सृतीस्थळी लष्करी इतमामात आज शुक्रवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

19 ऑगस्टला हरिद्वारमध्ये अटलजींचे अस्थिविसर्जन

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील राष्ट्रीय सृतीस्थळी लष्करी इतमामात आज शुक्रवारी सायंकाळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसईतील नुकसानग्रस्त रहिवासी आजही शासन मदतीपासून वंचित

वसई –  वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात जुलै महिन्यात मोठी अतिवृष्टी होऊन पावसाचे पाणी आणि सोबत पुराचे पाणी चक्क नागरिकांच्या घरात,दुकानात रस्त्यावर आदी ठिकाणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

‘इसोव’नी रचला भारतासाठी नवा इतिहास 

नवी दिल्ली – स्वित्झर्लंड मध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल स्पर्धेत अंदमान निकोबारच्या अवघ्या १७ वर्षीय इसोव अल्बानने रौप्य पदक जिंकून भारतासाठी नवा इतिहास...
Read More
post-image
महाराष्ट्र

माळशेज घाटात पर्यटकांची झुंबड

मुरबाड – पर्यटकांच्या सुरक्षितेच्या हेतूने ठाणे जिल्ह्याचे तात्कालीन कार्यरत  जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळ माळशेज घाटातील सर्व  धबधबे व इतर पर्यटक स्थळांवर...
Read More