राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित अन्य कोणाचाही अर्ज नाही – eNavakal
देश राजकीय

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित अन्य कोणाचाही अर्ज नाही

नवी दिल्ली –काँग्रेस अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राहुल गांधींच्या समर्थनार्थ 890 प्रस्ताव आले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.
त्याआधी दुपारी राहुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे प्रस्तावक होते. सोमवारीच उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख होती. रविवारपर्यंत कोणीही या पदासाठी अर्ज दाखल केला नव्हता. पाच डिसेंबरला म्हणजे उद्या अर्जाची छाननी होईल. राहुल गांधींच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केलेला नसल्याने राहुल गांधींची निवड निश्चितच आहे. असे झाल्यास काँग्रेस अध्यक्ष बनणारे गांधी-नेहरू कुटुंबातील ते सहावे सदस्य असतील.

रविवारी पक्षाध्यक्ष निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया आणि 47 वर्षीय राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत पक्ष मुख्यालयात बैठक झाली. पार्टीच्या सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीचे चेअरमन मुलापल्ली रामचंद्रन आणि मेंबर मधुसूदन मिस्त्रीही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी राज्यांच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. प्रत्येक राज्याच्या युनिटना उमेदवारी अर्जाचा एक एक सेट पाठवण्यास सांगण्यात आले आहे. त्यात राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव असेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि इतर मोठ्यांनी काँग्रेसाध्यक्ष पदासाठी राहुल गांधीच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्याशिवाय हे नेते राहुल गांधी अर्ज भरतानाही उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज दुपारी ३ वाजता मराठा आरक्षणाचा निकाल

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालय आज गुरुवारी दुपारी 3 वाजता आपला निर्णय...
Read More