हरसिमरत कौर का हसल्या? – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

हरसिमरत कौर का हसल्या?

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर माझ्याकडे बघून हसत आहेत, म्हणजेच त्यांना माझे भाषण आवडले आहे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत सांगितले. विरोधकच नाही तर सत्ताधारीदेखील माझ्या भाषणाला सहमत आहेत असे बोलून त्यांनी पंतप्रधानांना डिवचले. राहुल गांधींच्या विधानावर हरसिमरत कौर यांनी आक्षेप घेत आपली बाजू मांडली आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, पंजाबी नागरिकांना व्यसनाधीन म्हणणारे आज स्वतः काय खाऊन आले आहेत? यावरूनच आपल्याला हसू आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांची घेतलेली गळाभेट हे निव्वळ नाटक असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले. काही वेळाने कामकाज सुरु झाल्यावर राहुल गांधी यांनी सांगितले की सत्ताधाऱ्यांनी माझ्या भाषणाचे कौतुक केले आहे. तसेच हरसिमरत कौर माझ्याकडे बघून हसल्या. यावर कौर यांनी खुलासा केला आहे.

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More