गोवंडी येथे व्यापारी पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला – eNavakal
News गुन्हे

गोवंडी येथे व्यापारी पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

मुंबई – गोवंडी येथे व्यापारी पिता-पुत्रावर चार जणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध देवनार पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्या चौघांचा आता पोलीस शोध घेत आहेत. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अमजद अन्वर शेख हे व्यापारी असून ते गोवंडीतील देवनार, न्यू गौतमनगर परिसरात राहातात. चारही आरोपी त्याच परिसरातील असून त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून सूड घेण्यासाठी या चारही तरुणांनी सोमवारी सायंकाळी चार वाजता अमजद व तयांचे वडील अन्वर गुलाम शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

घातक शस्त्रांनी वार केल्याने अमजद हे गंभीररीत्या जखमी झाले होते. या दोघांनाही नंतर जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच अमजदवर उपचार सुरू आहेत. तर अन्वर यांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More