75 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी नोकरासह दोघांना अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

75 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी नोकरासह दोघांना अटक

मुंबई – सुमारे 75 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी एका नोकरासह दोघांना काल एल. टी मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने राजस्थान येथून अटक केली. गमनाराम ऊर्फ गोपाल भुराजी देवासी आणि लक्ष्मण कसनाराम देवासी अशी या दोघांची नावे आहेत. अकरा महिन्यानंतर या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या 1 जूनपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार हर्षद पोपटलाल कनाडिया हे व्यवसायाने व्यापारी आहेत. त्यांचा काळबादेवी परिसरात व्ही पटेल कुरिअर सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे. याच कंपनीत चार कर्मचारी कामाला असून त्यात गोपाल देवासी याचा समावेश आहे. गुजरात येथे कंपनीच्या काही शाखा असून तेथून काही व्यापार्‍यांचे व्यवहाराचे पैसे त्यांच्या कुरिअर कंपनीत येत होते. त्यानंतर त्यांचे पार्सल आणि कॅश संबंधित व्यक्तींना पोहचविण्याचे काम केले जात होते. 1 जून 2017 रोजी कार्यालयात विविध व्यापार्‍यांनी पाठविलेले 75 लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम हर्षद कनाडिया यांनी कंपनीच्या पहिल्या मजल्यावरील तिजोरीत ठेवून दिली होती. 2 जूनला सकाळी सात वाजता तिथे गोपाल आला आणि त्याने ही रक्कम पार्टीला द्यायची आहे असे सांगून तेथून निघून गेला. मात्र नंतर तो कामावर आला नाही. पार्टीला फोन केल्यानंतर तो तिथे आलाच नाही असे हर्षद कनाडिया यांना समजले होते. त्यानंतर त्यांनी एल टी मार्ग पोलिसांत पळून गेलेल्या त्यांचा नोकर गोपाल देवासीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच त्याचा पोलिसांनी शोध घेतला होता, मात्र गेल्या अकरा महिन्यांपासून तो फरार होता, तीन दिवसांपूर्वी तो त्याच्या राजस्थान येथील गावी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे जाऊन गोपाल आणि त्याचा मेहुणा लक्ष्मण देवासी या दोघांना अटक केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More