7.8 कोटी नागरिकांच्या ‘आधार’ची माहिती आयटी कंपनीने पळविली – eNavakal
News देश

7.8 कोटी नागरिकांच्या ‘आधार’ची माहिती आयटी कंपनीने पळविली

हैद्राबाद – येथील ‘आयटी ग्रीड’ या माहिती तंत्रज्ञान कंपनीकडे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील 7.8 कोटी नागरिकांची माहिती बेकायदेशीरपणे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलिसांनी ‘आधार’ने दिलेल्या तक्रारीनंतर आयटी ग्रिड्स या माहिती तंत्रज्ञान कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आधारने दिलेल्या फिर्यादीनुसार ही माहिती रिमुव्हेबल स्टोअरेज डिव्हाईसमध्ये आहे. हे आधार कायद्याचे उल्लंघन आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांची लोकसंख्या 8 कोटी 40 लाख आहे. त्यापैकी 7 कोटी 80 लाख लोकांची माहिती आयटी ग्रीड या कंपनीकडे आहे. तिने आपल्याकडील माहिती तेलगू देशम पक्षाचे सेवा मित्र हे अ‍ॅप तयार करण्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे़ आधारची ही माहिती सेंट्रल डेटा रिपोझिटरी किंवा स्टेट डेटा हब मधून कंपनीने बेकायदा पद्धतीने ताब्यात घेतल्याचा संशय आहे़ आधारने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आयटी ग्रीडच्या कार्यालयातून ताब्यात घेतलेल्या हार्ड डिस्कचे विश्लेषण करण्यात आले़ त्यातून मतदारांच्या चोरलेल्या माहितीसह आधारची माहिती सेवा मित्र अ‍ॅपसाठी वापरल्याचे तपासातून समोर आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More