50-50 फॉर्मुल्यासाठी सेना आग्रही तर 23 तारखेला एकाच व्यासपिठावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

50-50 फॉर्मुल्यासाठी सेना आग्रही तर 23 तारखेला एकाच व्यासपिठावर

मुंबई – काही दिवसांपुर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा दारून पराभव झाल्यानंतर भाजपा सावधान झाली आहे. एकीकडे आज झालेल्या भाजपाच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांसोबत वाद टाळण्याच्या सुचाना भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा नेत्यांना दिल्या असल्याचे संकेत आहेत, तर एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत भाजपा 2019 च्या निवडणुका शिवसेनेसोबत लढणार असल्याची माहिती अमित शाहांनी दिली. मात्र भाजपाने सेनेच्या सर्व अटी मान्य केल्या तर यूती संदर्भात विजार करू असे शिवसेनेचे मत असल्याचे समोर येत आहे. तर 23 डिसेंबर रोजी औरंगाबाद विद्यालयाच्या काही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला भाजपा-सेना एकाच व्यासपिठावर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याचे काय होणार याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना उधान आले आले.

2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या 266 जागांपैकी 122 जागा निवडुण आल्या होत्या, तर शिवसेना 282 जागांपैकी 82 जागांवर निवडुण आली होती. मात्र 2019 मध्ये होणाऱ्या निवडणूकांमध्ये 50-50 जागांच्या फॉर्मुल्यानुसार भाजपाकडे 144 जागांची मागणी शिवसेना करत आहे, त्यामुळे या फॉर्मुल्यानुसार निवणुका लढाण्यास भाजपा तयार असेल तर शिवसेना यूती करण्यास तयार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा दारून पराभव झाला, त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपावर दबाव टाकण्यासाठी शिवसेना नक्कीच प्रयत्न करेल, असे चित्र स्पष्ट होते, ते चित्र सत्यात उतरत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर औरंगाबादेत विद्यापिठाच्या होणाऱ्या कार्यक्रमावेळी भाजपा आणि शिवसेना एकत्ररित्या उपस्थिती असणार आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या मानापमानाचे नाट्य लवकरच संपेल अशी माहिती समोर येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More