5 विमानतळे चालविण्याचे मोदींच्या अदानीला कंत्राट – eNavakal
News देश

5 विमानतळे चालविण्याचे मोदींच्या अदानीला कंत्राट

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील आणि गुजरातचे असलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्या ताब्यात आता पाच विमानतळे देण्यात आली आहेत. अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, मंगळुरु आणि थिरुवनंतपूरम ही विमानतळे चालविण्याचे कंत्राट अदानींना मिळाले आहे. संचलन, व्यवस्थापन आणि विकास करण्याचा अधिकार अदानींना
मिळाले आहेत.
आज एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने विमानतळांचा ताबा व विकास करण्यासाठी एकूण 32 कंपन्यांनी दिलेल्या निविदा उघडल्या. त्यामध्ये अदानी यांना 5 विमानतळे मिळाली. अदानी यांनी लावलेली बोली सर्वात जास्त असल्याने त्यांच्या ताब्यात अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, मंगळुरू व थिरुवनंतपुरम ही विमानतळे आली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही विमानतळे अदानींना हस्तांतरीत करण्यात येतील.
डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने भारतातील सहा विमानतळांच्या विकासासाठी निविदा मागवल्या होत्या. आज 25 फेब्रुवारीला या निविदा उघडण्यात आल्या. त्यात 5 विमानतळे अदानींच्या ताब्यात गेली. या विमानतळांसाठी जीएमआर, एएमपी (इंग्लंड), पीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोस्ट्रेड, एनआयआयएफ, के एसआयडीसी, आय इन्व्हेस्टमेंट लिमिटेड व साना अशा दहा कंपन्यांनी या 32 बोली लावल्या होत्या. त्यापैकी अहमदाबाद आणि जयपूर विमानतळांसाठी प्रत्येकी सात निविदा गुवाहाटी व लखनऊसाठी प्रत्येकी सहा निविदा व थिरुवनंतपूरमसाठी प्रत्येकी निविदा आल्या होत्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More