5 राज्यांतील निकालांनी भाजप सावध 19 तारखेला ‘वर्षा’वर आमदारांची बैठक – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

5 राज्यांतील निकालांनी भाजप सावध 19 तारखेला ‘वर्षा’वर आमदारांची बैठक

मुंबई – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांत झालेल्या पराभवामुळे प्रदेश भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. या वातावरणाचा फटका येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार 19 डिसेंबरला वर्षावर राज्यातील आमदारांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत राज्य सरकार आणि आमदारांच्याही कामगिरीवर चर्चा करण्यात येणार आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन महत्वाच्या राज्यात भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागलेले हे निकाल म्हणजे भाजपला इशारा मानला जात आहे. राज्यात तर विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे आतापासून सावध झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि दादर येथील प्रदेश कार्यालयात आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतानाच त्यांच्या मतदारसंघातील सर्वेक्षणाचे अहवालही हाती सोपविण्यात आले होते. सुमारे 40 ते 45 आमदारांना कामगिरीत सुधारणा केली नाही तर तिकिटे कापण्याचाही इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र 19 तारखेच्या बैठकीत आमदारांच्या कामगिरीबरोबरच राज्यातील जनमताचा कानोसाही मुख्यमंत्री घेतील, अशी चर्चा आहे. राज्य सरकारने घेतलेले निर्णय आणि पुढील दोन महिन्यात कोणते निर्णय घ्यायचे यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More