पुणे – आज चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे मुख्य शिवलिंगावर विविध रंगबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन अद्याप शिथिल न झाल्याने भिमाशंकर मंदिरात चौथ्या श्रावणी सोमवारही भक्ताविना संपन्न झाला. फक्त 5 पुजाऱ्यांनी उपस्थितीत महादेवाची महाआरती आणि महाभिषेक केला.
लॉकडाऊनमुळं यंदा भिमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच श्रावण मासात भिमाशंकर परिसर भक्तांविना ओस पडला. दरवर्षी श्रावण महिन्यांत लाखोंच्या संख्येने भाविक भिमाशंकर येथे हजेरी लावतात. त्यानंतर आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी भाविक भटकंती करतात.
भीमाशंकर परिसरात बाहेर व्यक्ती प्रवेश करू नये म्हणून रस्त्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.