370 हटवल्यानंतर मोदींनी मांडली भूमिका! काश्मीरचा विकास करणार – eNavakal
News देश

370 हटवल्यानंतर मोदींनी मांडली भूमिका! काश्मीरचा विकास करणार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केले. पाकिस्ताने कलम 370 चा दहशतवादासाठी शस्त्रासारखा वापर केला. या कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचारातच वाढ झाली. जम्मू-काश्मीरचे तरुण नेतृत्व पुढे येऊ दिले नाही. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा वाढवून जम्मू-काश्मीरचा विकास करण्यात येईल., तसेच तेथे लवकरच विधानसभा निवडणुका घेण्यात येतील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत झाल्यानंतर पुन्हा जम्मू-काश्मीरला राज्याला दर्जा बहाल करण्यात येईल. जम्मू-काश्मीरला केंद्राच्या अखत्यारित ठेवण्याचा निर्णय खूप विचार करुन घेण्यात आला आहे. राज्यपाल राजवट असल्यामुळे काश्मीरमध्ये आता सुशासन दिसत आहे. कागदावर असलेल्या अनेक योजना आता प्रत्यक्षात दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तेथील पोलिसांना अन्य राज्यांच्या पोलिसांसारख्या सुविधा मिळत नाहीत, त्यांना तो लवकरच दिल्या जाणार आहे. सरकारी रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया लगेच सुरु होईल, त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल. जम्मू-काश्मीकमध्ये मुले शिक्षणापासून वंचित होती. त्यांचा काय गुन्हा होता. मात्र आता त्यांना हा अधिकार मिळणार आहे.
आता दुसर्‍या राज्याप्रमाणे जम्मू-काश्मीरमधील सफाई कर्मचारी आणि कामगारांना कायदा आणि इतर सुविधा मिळणार आहेत. लडाख हा केंद्र शासित प्रदेशच राहणार आहे. त्यामुळे लडाखच्या विकासाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. देशातील सर्व चित्रपट निर्मात्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यास प्राधान्य द्यावे. हिंदी, मराठी, तेलुगू, तमीळ, मल्याळम आदी चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी जम्मू-काश्मीरसारख्या राज्याला चित्रीकरणास बिनदिक्कत जावे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वोत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन बनण्याची क्षमता आहे. मला यासाठी देशवासियाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. परिस्थिती सामान्य झाली तर काश्मीरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल. यामुळे रोजगार वाढेल. चित्रपटसृष्टीने काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा, कलम 370 हटवल्यानंतर नवे सदस्य पंचायत व्यवस्थेत काम करताना कमाल करुन दाखवतील हा माझा विश्वास आहे. असे मोदी म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More
post-image
महाराष्ट्र

घाटी रुग्णालयात डॉक्टर परिचारिकांचे स्क्रीनिंग सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची स्क्रिनिंग घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. कोरोनाच्या 3...
Read More
post-image
देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस यांची प्रकृती खालावली, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

लंडन – १० दिवसांपूर्वी बोरिस यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर नियमित चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात नेले असता प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात...
Read More