#370 सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

#370 सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिकाकर्ते वकील एम. एल. शर्मा यांना फटकारले. ‘अर्धा तास याचिका वाचली तरी तुम्हाला याचिकेतून काय म्हणायचे आहे, याचे आकलन होत नाही. तुमची याचिका सुनावणीयोग्य वाटत नाही’, असे सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना सुनावले. ‘ही याचिका फेटाळलीही असती पण त्याचा इतर याचिकांवर परिणाम होईल. त्यामुळे हा निर्णय घेणे टाळत आहोत मात्र अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सहापैकी चार याचिका निरर्थक आहेत’, असे गोगोई म्हणाले. यानंतर याचिकाकर्ते एम. एल. शर्मा यांनी याचिकेत आवश्यक त्या सुधारणा करू, असे न्यायालयाला सांगितले. दरम्यान, यावरील पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.

६ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले होते. त्यानुसार जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती...
Read More
post-image
News विदेश

फ्लोरिडात गोळीबार! हल्लेखोराला कंठस्नान

फ्लोरिडा – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आज पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एका बंदुकधार्‍याने नौदलाच्या तळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला....
Read More
post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More