350 साखर कारखाने बंद झाले! नितीन गडकरींची कबुली – eNavakal
News महाराष्ट्र

350 साखर कारखाने बंद झाले! नितीन गडकरींची कबुली

लातूर – केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी आज प्रांजळ कबुली दिली की, महाराष्ट्रातील 300-350 साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे आता शेतकर्‍यांनी आपल्या ऊसापासून इथेनॉल बनवावे, असा सल्ला दिला.
नितीन गडकरी हे भाजपाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा प्रचार करण्यासाठी देवणीला आले होते. यावेळी नितीन गडकरी यांनी साखर कारखाने बंद झाल्यामुळे शेतकर्‍यांनी ऊसाचे काय करायचे याचा उपाय सांगितला. ते म्हणाले, ऊसाच्या रसापासून सायरप आणि सायरपपासून इथेनॉल बनविता येईल, तसेच धान्याच्या कणसापासून बायो-सीएनजी तयार होते. ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी इथेनॉल बनवावे. त्यामुळे त्यांचा ट्रॅक्टर इथेनॉलवर चालेल व त्यांचे वर्षाला 50 हजार वाचतील.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, सध्या भारत दरवर्षी 8 लाख कोटींचे पेट्रोल परदेशातून आयात करतो. पेट्रोल 85 रुपये तर इथेनॉल 52 रुपये लिटर आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी निर्माण केलेल्या इथेनॉलसाठी भारतात मोठी बाजारपेठ आहे. सीएनजी गॅसही प्रतिकिलो 55 रुपयांनी विकला जातो. म्हणून शेतकर्‍यांनी ऊसापासून इथेनॉल व कणसांपासून बायो-
सीएनजी बनवावा.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More