अमरावतीच्या पेढी नदीत तिघे जण बुडाले, शोध सुरु – eNavakal
महाराष्ट्र

अमरावतीच्या पेढी नदीत तिघे जण बुडाले, शोध सुरु

अमरावती – जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. यावेळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेढी नदीच्या काठावर वसलेल्या आमला गावातील तीन व्यक्ती नदीत बुडल्याची दुर्दैवी घटना घडली. बुडालेल्या तिघा जणांचा शोध घेण्याचे काम आपत्ती नियोजन बचाव पथकाकडून सुरु होते.

गोवर्धन वानखडे (50), सतीश अण्णाजी भुजाडे (46) आणि अंकुश सुरेश सगणे (28 ) अशी नदीत बुडालेल्या तिघा जणांची नावे आहेत. रविवारी रात्री अमरावती शहरासह लगतच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. पाऊस सुरू असताना पेढी नदी ओसंडून वाहायला लागली. यावेळी आमला गावातील पद्माकर गोवर्धन वानखडे, सतीश अण्णाजी भुजाडे आणि अंकुश सुरेश सगणे हे तिघे अचानक नदीतच्या प्रवाहात सापडले आणि पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येत नदी काठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलीस आणि जिल्हा आपत्ती नियोजनाचे बचाव पथक घटनास्थळी पोचले आणि त्यांनी नदीत उतरून नदीत बुडालेला तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री अंधारात शोध मोहीम थांबविल्यावर आज सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बचाव पथक नदीच्या पात्रात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी उतरले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘लिपिक’ पदाचे पदनाम आता ‘महसूल सहायक’

मुंबई – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. महाराष्ट्र राज्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार

मुंबई – संगमनेर तालुक्यातील मंगळापुरसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १४ हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण

मुंबई – राज्यात आज ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला केलेली मदत वादाच्या भोवऱ्यात, बेकायदा व्यवहार झाल्याचा दावा

मुंबई – कोरोनाकाळात शिवभोजन योजनेसाठी आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला १० कोटींची मदत केली होती. मात्र, ही मदत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली...
Read More
post-image
देश

येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबात नियमावली जारी...
Read More