काळ्या विद्येच्या आहारी गेल्याने तीन जिवलग मित्रांची सामूहिक आत्महत्या – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

काळ्या विद्येच्या आहारी गेल्याने तीन जिवलग मित्रांची सामूहिक आत्महत्या

शहापूर – जीवलग मित्रांच्या आत्महत्या ही तिघांनी ‘मोक्ष’ मिळवण्यासाठी केली असल्याची चर्चा शहापूरमध्ये सुरू आहे. या तिघांनी अमावशेच्या दिवशीच एकाच साडीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांना याबाबत कुठलेही ठोस पुरावे अद्याप मिळून आलेले नसून याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे शहापूर तालुका विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले.

शहापूरमधील चांदा गावात राहणारे नितीन बेहरे (३०), मुकेश घावटे (२८) आणि महेंद्र दुबले (३१) या तीन जिवलग मित्रांनी गावाच्या बाहेर असणाऱ्या एका झाडाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. या तिघांच्या आत्महत्येने शहापूर तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. शहापूर पोलिसांना या तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते. घटनास्थळी दोन देशी दारूच्या बॉटल आणि तिघांच्या खिशात मोबाईल फोन मिळून आले होते. हे तिघे मित्र १४ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाले होते. अखेर १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी शहापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

नितीन बेहरे हा तांत्रिक विद्याच्या आहारी गेला होता. रात्री बेरात्री हे तिघे स्मशानात जावून काहीतरी विधी करीत असल्याचे अनेकांनी त्यांना बघितले होते, अशी चर्चा चांदा गावात सुरू आहे. परंतु पोलिसांना याबाबत कुठलेही ठोस पुरावे अद्याप मिळून आलेले नाहीत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भारतात घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी बनवला बोगदा; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा खुलासा

श्रीनगर – नगरोटा चकमकीचा तपास करणार्‍या सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

काळ्या विद्येच्या आहारी गेल्याने तीन जिवलग मित्रांची सामूहिक आत्महत्या

शहापूर – जीवलग मित्रांच्या आत्महत्या ही तिघांनी ‘मोक्ष’ मिळवण्यासाठी केली असल्याची चर्चा शहापूरमध्ये सुरू आहे. या तिघांनी अमावशेच्या दिवशीच एकाच साडीने झाडाला गळफास लावून...
Read More
post-image
मनोरंजन

‘नाळ’मधील चैत्या ‘छुमंतर’, लंडनमध्ये चित्रीत झालेला सिनेमा लवकरच येणार

लॉकडाऊन शिथील झाल्यावर आणि सरकारकडून चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेक सिनेमांच्या, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मराठी सिनेमांनी देखील अनेक ठिकाणी जाऊन योग्य ती काळजी घेऊन चित्रिकरण...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. अशात शनिवारी खबळबळ उडवून देणारी घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक! दोघांना अटक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी तुटलेल्या काचेच्या भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक केल्याप्रकरणी नांदेड व उत्तरप्रदेश येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी मोठ्या शिताफीने अटक केली.त्यांच्याकडून तब्बल...
Read More