29 पाणी पुरवठा समित्यांवर करणार गुन्हे दाखल – eNavakal
गुन्हे जीवनावश्यक महाराष्ट्र

29 पाणी पुरवठा समित्यांवर करणार गुन्हे दाखल

जळगाव- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत भारत निर्माण योजनेत जिल्ह्यातील 29 पाणी पुरवठा योजना समित्यांवर अपहार व अनियमीतता प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 14 रोजी दिले. ग्रामीण पाणी पुरवठा योजना आढावा बैठक जि. प. च्या सानेगुरुजी सभागृहात झाली. या बैठकीत संबंधित पाणी पुरवठा योजना समिती अध्यक्ष, सचिव तसेच तांत्रिक सल्लागार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिवेगावकर यांनी दिले. ही कार्यवाही 20 डिसेंबर्पयत करण्याची ताकीद दिली असून शाखा अभियंता, उपअभियंता व गटविकास अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बैठकीस पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता एस. बी. नरवाडे, अभियंता व चोपडा, जळगाव, भुसावळ, धरणगाव येथील गटविकास अधिकारी उपस्थित होते.यापूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा आढावा 22 ऑक्टोबर रोजी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला होता. त्यावेळी मुल्यांकण न करणे, प्रत्यक्षात काम न करता पैसे काढणे, समितीने दप्तर सादर न करणे आदी कारणांमुळे एकूण 40 समित्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. सात दिवसाची कार्यवाही करण्याची मुदत दिली होती. परंतु काही दिवस संधी देत 14 डिसेंबर रोजीच्या बैठकीत फेरआढावा घेण्यात आला. त्यावेळी 29 ठिकाणी अपहार व अनियमीतता आदी बाबी कायम असल्याचे दिसून आल्याने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर इतर कामे अपूर्ण असलेल्या 31 गावांना काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 15 दिवस ते 3 महिने अशी ही मुदत असून 4 गावांची कामे पूर्ण झाली आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More