29 गावे वगळण्याप्रकरणी 2 मे रोजी अंतिम सुनावणी – eNavakal
News न्यायालय महाराष्ट्र

29 गावे वगळण्याप्रकरणी 2 मे रोजी अंतिम सुनावणी

वसई- वसई-विरार महापालिकेतील ती 29 गावे वगळण्याचे घोेंगडे अजूनही भिजत आहे. गेल्या आठवड्यांत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची अंतिम सुनावणी दोनवेळा पुढे ढकलत आज घेण्यात येईल असे आदेशात सांगितले होते. मात्र आज पुन्हा एकदा गावे वगळण्याबाबतची अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात बोर्डावर आलीच नसल्याने आता उच्च न्यायालयाकडून ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला कायम ठेवत या प्रकरणी येत्या गुरुवारी, 2 मे रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती जन आंदोलन समितीचे पदाधिकारी प्रफुल ठाकूर यांनी दिली.
ज्येष्ठ सरकारी वकिल व जन आंदोलन समितीचे याचिकाकर्ते यांनी आज मागील आदेशात म्हटल्यानुसार 30 एप्रिलची तारीख अंतिम सुनावणीसाठी बोर्डावर असताना आज अचानक हे प्रकरण बोर्डावर का आले नाही?, असा सवाल उपस्थित केला. तसेच या प्रकरणांचा अंतिम आदेशच उच्च न्यायालयातील न्यायाधिशांना दाखवून आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी जन आंदोलन समितीच्यावतीने वकिलांनी उच्च न्यायालयाने मे सुट्टी आधीच या प्रकरणाचा निकाल द्यावा व बुधवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने गुरुवारी 2 मेची तारीख द्यावी अशी आर्जव कोर्टाला केली. परिणामी गावांचे लटकलेले प्रकरण व मागील आठवड्यात झालेला आदेश पाहता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या.गवई व न्या. नायडू यांच्या खंडपीठाने लागलीच जन आंदोलनच्या या चिकाकर्त्यांना येत्या गुरुवार 2 मेची तारीख देण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता पुन्हा 2 मेच्या तारखेकडे व कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नोव्हेंबरअखेरपर्यंत कोरोना संपुष्टात येईल, सत्तेतील नेत्याचा दावा

नगर – कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोरोना केव्हा संपुष्टात येईल याबाबत अद्यापही कोणतेही संकेत नसताना ग्रामविकास मंत्री आणि नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नोव्हेंबरपर्यंत कोरोना...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘शब्दच्छल करणाऱ्या सगळ्यांनाच शरद पवारांनी गारद केलंय’

पुणे -संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुलाखतीला दिलेले  ‘एक शरद, सगळे गारद’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे, कारण शरद पवारांनी सगळ्यांनाच गारद केले आहे, असे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कुलगुरू, युसीजीसोबत चर्चा करूनच परीक्षा रद्द केल्या, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनीही दिलासा- उदय सामंत

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येणार नसल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यामुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सत्ताधारी घरात बसलेत, आम्ही जनतेकरता राजकारण करतो- देवेंद्र फडणवीस

जळगावत – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

सारथी संस्थेचे सारथ्य आता अजित पवारांच्या हातात! सारथी संस्थेला तातडीने ८ कोटी दिले!

मुंबई – मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्यासाठी उभी केलेली ‘सारथी’ संस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या मदत आणि...
Read More