राज्यात आज ८२१ जण डिस्जार्ज, ६० मृत्यू, तर २६०८ नवे रुग्ण – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ८२१ जण डिस्जार्ज, ६० मृत्यू, तर २६०८ नवे रुग्ण

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा (coronavirus)आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज २४ तासांत २६०८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ४७ हजार १९० रुग्ण झाले आहेत.

आज राज्यात ८२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे १३ हजार ४०४ रुग्ण आतापर्यंत बरेे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ४०, पुण्यात १४, सोलापुरात २, वसई-विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाण्यात १, तर नांदेडमध्ये १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ हे मागील २४ तासांतील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत. तर, आतापर्यंत राज्यात एकूण १५७७ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वाचा – कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत ७, सिंधुदुर्गात ८ नवे रुग्ण

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरूष, तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत, तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तर, ७ जण ४० वर्षांखालील आहेत. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

वाचा – राज्यातील कोविड योद्धांसाठी मुख्यमंत्र्यांचे भावनिक पत्र

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार ०२६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटीव्ह आले तर, ४७ हजार १९० जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर, सध्या राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाइन असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्म क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा – सोशल मीडियावर भडकावू पोस्ट टाकाल तर याद राखा; गृहमंत्र्यांचा इशारा

 • कुठे किती रुग्ण (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

  मुंबई महानगरपालिका: २८ हजार ८१७ (९४९),

 • ठाणे: ३९४ (४),
 • ठाणे मनपा: २ हजार ४०५ (३५),
 • नवी मुंबई मनपा: १ हजार ७७८ (२९),
 • कल्याण डोंबिवली मनपा: ७८४ (७),
 • उल्हासनगर मनपा: १४५ (३),
 • भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३),
 • मीरा भाईंदर मनपा: ४४२ (४),
 • पालघर: १११ (३),
 • वसई विरार मनपा: ४९९ (१५),
 • रायगड: ३२१ (५),
 • पनवेल मनपा: २९५ (१२),
 • ठाणे मंडळ, एकूण: ३६ हजार १७३ (१ हजार ०६९).
 • नाशिक: ११५,
 • नाशिक मनपा: १०५ (२),
 • मालेगाव मनपा: ७११ (४४),
 • अहमदनगर: ५३ (५),
 • अहमदनगर मनपा: १९.
 • धुळे: १७ (३), धुळे मनपा: ८० (६),
 • जळगाव: २९० (३६),
 • जळगाव मनपा: ११३ (५),
 • नंदूरबार: ३२ (२),
 • नाशिक मंडळ, एकूण: १ हजार ५३५ (१०३).
 • पुणे: ३१२ (५),
 • पुणे मनपा: ४ हजार ८०५ (२४५).
 • पिंपरी चिंचवड मनपा: २३० (७),
 • सोलापूर: २२ (१),
 • सोलापूर मनपा: ५४५ (३४),
 • सातारा: २०४ (५).
 • पुणे मंडळ : ६ हजार ११८ (२९७).
 • कोल्हापूर: २०६ (१),
 • कोल्हापूर मनपा: २३,
 • सांगली: ६३,
 • सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१),
 • सिंधुदुर्ग: १०,
 • रत्नागिरी: १४२ (३),
 • कोल्हापूर मंडळ, एकूण: ४५५ (५).
 • औरंगाबाद:२२,
 • औरंगाबाद मनपा: १ हजार १९७ (४२),
 • जालना: ५४,
 • हिंगोली: ११२,
 • परभणी: १७ (१),
 • परभणी मनपा: ५,
 • औरंगाबाद मंडळ, एकूण: १ हजार ४०७ (४३).
 • लातूर: ६४ (२),
 • लातूर मनपा: ३,
 • उस्मानाबाद: २९,
 • बीड: २६,
 • नांदेड: १५,
 • नांदेड मनपा: ८५ (५),
 • लातूर मंडळ. एकूण: २२० (७).
 • अकोला: ३१ (२),
 • अकोला मनपा: ३४२ (१५),
 • अमरावती: १३ (२),
 • अमरावती मनपा: १४३ (१२),
 • यवतमाळ: ११३,
 • बुलढाणा: ३९ (३),
 • वाशिम: ८,
 • अकोला मंडळ एकूण: ६८९ (३४).
 • नागपूर: ३,
 • नागपूर मनपा: ४६२ (७),
 • वर्धा: ३ (१),
 • भंडारा: ९,
 • गोंदिया: ३९,
 • चंद्रपूर: ८,
 • चंद्रपूर मनपा: ७,
 • गडचिरोली: १३,
 • नागपूर मंडळ एकूण: ५४५ (८).
 • इतर राज्ये: ४८ (११),

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More
post-image
देश

न्यूझिलंडमधील माध्यम संस्था १ डॉलरला विकली

वेलिंग्टन – कोरोना महामारीमुळे उदयोग व्यवसाय संकटात आले आहेत. त्याचे परिणाम जगासमोर येऊ लागले आहेत. न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन माश्याच्या मृत्यूची संख्या वाढली

रत्नागिरी – कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर

सोलापूर – सोलापुरात आज कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ५९ झाली आहे. तर एकूण...
Read More