कोविड योद्धेच कोरोनासंक्रमणात, गेल्या २४ तासांत २४७ पोलिसांना लागण – eNavakal
महाराष्ट्र

कोविड योद्धेच कोरोनासंक्रमणात, गेल्या २४ तासांत २४७ पोलिसांना लागण

मुंबई – कोरोनाविरोधात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात २४७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. तर, यामध्ये दोघांचा मृत्यूही झालाय. कर्तव्यावर असतानाच पोलिसांना कोरोनाची लागण होत असून दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे.

नव्या बाधितांमुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता २० हजार ३ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार ७२८ जण, कोरोनामुक्त झालेले १६ हजार ७१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २०४ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील २० हजार ३ कोरोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार १६३ अधिकारी व १७ हजार ८४० कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार ७२८ पोलिसांमध्ये ४४७ अधिकारी व ३ हजार २८१ कर्मचारी आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या १६ हजार ७१ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ६९६ व १४ हजार ३७५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २०४ पोलिसांमध्ये २० अधिकारी व १८४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘अंनिस’च्या हस्तक्षेप याचिकेवर इंदोरीकर महाराजांचा आक्षेप

शिर्डी – कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हस्तक्षेप याचिका सादर केली होती. त्यावर इंदोरीकर महारांच्या वकिलांनी आक्षेप घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या महापौरांना भाजपच्या ६५ नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं पत्र धाडलं

मुंबई – कोविड सेंटरच्या उभारणीचं कंत्राट मुलाला देणं, कंगना रानौतचं कार्यालय पाडणं आदी विषयांमुळे चर्चेत असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोविड योद्धेच कोरोनासंक्रमणात, गेल्या २४ तासांत २४७ पोलिसांना लागण

मुंबई – कोरोनाविरोधात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात २४७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

‘अर्थव्यस्थेला गती देण्याकरता खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं’, शक्तिकांत दास यांचे आवाहन

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थचक्र बिघडलं आहे. त्यामुळे आता अनलॉकच्या प्रक्रियेत देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी रिझर्व्ह बँक...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोनामुक्त झाल्यावर होम क्वारंटाइन असलेल्या इसमाने केली आत्महत्या

पुणे – एकीकडे पुण्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असतानाच रुग्णांमध्ये नैराश्येचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या एका इसमाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली...
Read More