243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद – eNavakal
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी आज पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत पाठवलेल्या नोटीसा त्वरीत मागे घेण्याची मागणी केली.
मुंबईच्या माया नगरीत मोठ्या प्रमाणात महिला बचत गट स्थापन आहेत. या बचत गटांना पालिका कामे देते. पालिकेच्या शिक्षण विभागाने नोंदणीकृत 250 महिला बचत गटांपैकी 243 संस्थांना खिचडीसाठी शासनाकडून देण्यात येणार्‍या तांदूळ अपहार प्रकरणात दोषी ठरवून त्यांना काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती शिवसेनेचे सदस्य संजय घाडी यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे निदर्शनास आणून दिले. दहिसरमधील नंदाई महिला मंडळालाही अशा प्रकारे काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजावली आहे. परंतु या संस्थेने आजवर शासनाकडून तांदूळ घेतलेला नाही किंवा शासकीय लाभही घेतलेला नाही. तरीही त्या संस्थेला नोटीस देण्यात आल्याचे सांगत कशा प्रकारे महिला संस्थांवर पालिका अन्याय करत आहे, याचे उदाहरण दिले. त्यामुळे 243 संस्थांना दिलेल्या नोटीस त्वरीत मागे घेऊन त्यांना शालेय पोषण आहाराच्या कंत्राटात सहभागी करून घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. तर एका बाजूला महिला सक्षमीकरणासाठी पालिकेने प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे महिलांचा रोजगार काढून त्यांना दुर्बल बनवायचे याचा तीव्र निषेध आपण करत असल्याचे सांगत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी पुणे महापालिकेने ज्याप्रमाणे आपल्या बाजार किंवा समाजकल्याण केंद्राच्या जागा महिला बचत गटांसाठी राखीव ठेवत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच धर्तीवर त्या महिला संस्थांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना केली. पालिकेच्या सर्व कार्यालयांमधील उपहारगृहे ही महिला बचत गटांना चालवण्यास दिली जावीत, अशी सूचना भाजपच्या राजेश्री शिरवाडकर यांनी केली. पालिका शाळांमधील शालेय पोषण आहारांमधून आता महिला बचत गटांना हद्दपार केले जात असून यापूर्वी इस्कॉन आणि अक्षयपात्रा या संस्थांना इन केल्यानंतर आता या संस्थांना कायमचाच बाहेर रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी 250 नोंदणीकृत महिला बचत गटांपैकी तब्बल 243 संस्थांना तांदूळ अपहार प्रकरणात गोवून त्यांना पालिकेच्या नवीन शालेय पोषण आहाराच्या कंत्राटातून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जोवर या संस्थांवरील गुन्हा सिद्ध होत नाही, तोवर या संस्थांना पालिकेच्या पोषण आहाराच्या कंत्राटातून वगळले जाऊ नये, असे आदेश देत या कंपन्यांना काळ्या यादीत टाकू नये, तसेच पालिकेच्या निविदांमध्ये त्यांना नाकारले जाऊ नये, अशी सूचना पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, राजकारण आमच्यासाठी धंदा नाही – संजय राऊत

मुंबई – ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात शब्दाला किंमत आहे. आमची वृत्ती व्यापारी नाही,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#HappyChildrensDay दारातून डोकावणारी ‘ती’ आज वर्गात बसून शिकतेय

हैदराबाद – असे म्हणतात की, ‘एक फोटो हा हजारो शब्दांसमान असतो.’ अशीच कमाल हैदराबादमधील एका छायाचित्रकाराने टिपलेल्या फोटोने केली आहे. दाराबाहेर उभी राहून वर्गात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संजय राऊत म्हणतात…’अब हारना और डरना मना है’

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली प्रचंड वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडून ‘पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच’, अशी घोषणा...
Read More