24 तासांत 61,871 नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 74,94,552 वर – eNavakal
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 61,871 नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 74,94,552 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार 871 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1 हजार 033 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 74 लाख 94 हजार 552 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 14 हजार 031 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 65 लाख 97 हजार 210 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 7 लाख 83 हजार 311 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 8 राज्यांमध्ये 48 टक्के रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यात महाराष्ट्रातील 15 जिल्हे, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरातमधील प्रत्येकी दोन जिल्हे आणि पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका जिल्ह्याचा समावेश आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यासह 10 राज्ये अशी आहेत जिथे कोरोनाचे 77 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 61,871 नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 74,94,552 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर

बारामती – परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,791, पुण्यात 946 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,86,321 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. शनिवारी आढळलेल्या 10 हजार 259 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : धडाकेबाज दिल्लीचा चेन्नईवर दणदणीत विजय

शारजा – शिखर धवनचे धडाकेबाज शतक आणि अक्षर पटेलने अखेरच्या षटकांत फटकावलेल्या तीन षटकारांच्या जोरावर श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर...
Read More
post-image
News देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय यांचा जेडीयूत प्रवेश

लखनऊ- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रमेश उपाध्याय यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) या पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील जेडीयूचे अध्यक्ष अनूप...
Read More