24 तासांत 55,722 नवे कोरोना रुग्ण! भारताने 75 लाखांचा टप्पा ओलांडला – eNavakal
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 55,722 नवे कोरोना रुग्ण! भारताने 75 लाखांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 55 हजार 722 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 579 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 75 लाख 50 हजार 273 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 14 हजार 610 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 66 लाख 63 हजार 608 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 7 लाख 72 हजार 055 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 8 राज्यांमध्ये 48 टक्के रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यात महाराष्ट्रातील 15 जिल्हे, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरातमधील प्रत्येकी दोन जिल्हे आणि पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका जिल्ह्याचा समावेश आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यासह 10 राज्ये अशी आहेत जिथे कोरोनाचे 77 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 55,722 नवे कोरोना रुग्ण! भारताने 75 लाखांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 55 हजार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

अखेर आजपासून मुंबई मेट्रो रुळावर

मुंबई – लॉकडाऊनमुळे जवळपास सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील मेट्रोसेवा अखेर आज रुळावर आली आहे. सर्व मुंबईकरांसाठी आजपासून घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सुविधा सुरू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,600, पुण्यात 817 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,95,381 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. रविवारी आढळलेल्या 9 हजार 060 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धनंजय मुंडे शेताच्या बांधावर

बीड – परतीच्या जोरदार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकविम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल असा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

SRH vs KKR IPL : सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय

दुबई – कोलकताच्या संघाने हैद्राबादविरुद्धच्या लढ्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. कोलकाताने २० षटकांत १६३ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने...
Read More