24 तासांत 10,584 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,10,16,434 वर – eNavakal
कोरोना देश

24 तासांत 10,584 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,10,16,434 वर

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थितीबाबत चिंता वाढत असतानाच आता देशभरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत 10,584 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 78 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,10,16,434 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,56,463 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 13,255 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,07,12,665 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,47,306 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच परदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाण प्रकरणात आमच्याकडे ठोस माहिती! चित्रा वाघ यांचा खास मुलाखतीत घणाघात

मुंबई-  पूजा चव्हाण प्रकरणामध्ये सरकारचा पोलीस यंत्रणेवर पूर्णपणे हस्तक्षेप आणि नियंत्रण आहे हेच स्पष्ट होत आहे. त्यामुळेच अद्याप अरुण राठोड आणि त्याच्याबरोबर असणार्‍या आणखीन...
Read More
post-image
News देश

भारत-फ्रान्समधील सामंजस्य कराराला केेंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केेंद्रीय मंत्रिमंडळाने नवीकरणीय उर्जा सहकार्य क्षेत्रातील भारत तसेच फ्रान्समधील सांमजस्य कराराला आज मंजुरी दिली. जानेवारी 2021 मध्ये या...
Read More
post-image
News देश

फारुख अब्दुल्लांविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला मागणारी याचिका सुप्रीम कोर्टाने आज बुधवारी फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाने म्हटले...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करणारच – मुख्यमंत्री

मुंबई- एक वर्ष मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संसदीय कामकाजात आणि विधानसभेत बाजू मांडण्यात पारंगत झाले आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांची...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी हायकोर्टात फौजदारी याचिका

मुंबई- माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीची फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत...
Read More