24 जानेवारीला अमित शहा सांगली, तासगावच्या दौर्‍यावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

24 जानेवारीला अमित शहा सांगली, तासगावच्या दौर्‍यावर

सांगली – येत्या 24 जानेवारी रोजी सांगली आणि तासगाव शहरांच्या दौर्‍यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा येणार असून संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. सांगलीसह तासगावमध्ये त्यांच्या हस्ते काही कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज दिली.

शहा हे पहिल्यांदाच सांगलीला येत असल्यामुळे त्यांच्या दौर्‍याची जंगी तयारी भाजप करणार आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे. शहा 24 जानेवारीला सकाळी येथील श्री गणपती मंदीरात दर्शन घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, प्रमुख पदाधिकार्‍यांशी संवाद साधतील. भाजप जिल्हा कार्यालयासाठी विजयनगर येथील नव्या न्यायालय इमारतीच्या पाठीमागील बाजूस अडीच एकर जागा खरेदी करण्यात आली आहे. त्याचे भूमीपूजन शहा यांच्या हस्ते करण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा मानस आहे. दुसर्‍या सत्रात तासगाव येथे खासदार संजय पाटील यांच्या नियोजनानुसार काही कार्यक्रम होणार आहेत. त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरण होणार आहे. रात्री ते कोल्हापूरला मुक्कामी असतील, असे गाडगीळ यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More