‘2019 मध्ये मतपत्रिका वापरल्यास भाजपचा पराभव निश्चित’ – मायावती – eNavakal
देश राजकीय

‘2019 मध्ये मतपत्रिका वापरल्यास भाजपचा पराभव निश्चित’ – मायावती

लखनऊ – उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकांमध्ये मायावतींच्या बसपाने अनेक ठिकाणी विजय मिळवला आहे. येथील एका सभेत बोलताना बसपच्या अध्यक्षा मायावतींनी भाजपवर तोफ डागली आहे. “२०१९ साली होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान जर मतपत्रिकेवर झालं तर भाजप कधीच निवडून येणार नाही हा माझा दावा आहे.” असं मायावती म्हणाल्या.

‘‘पुढच्या लोकसभेच्या निवडणुका 2019 मध्ये आहेत. भाजप म्हणते, की लोकांचे त्यांना समर्थन आहे तर मग त्यांनी कागदी मतपत्रिकांनी निवडणुका घेऊन दाखवाव्यात. भाजप कधीही जिंकू शकणार नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते,”असे त्या म्हणाल्या.  स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसपाने विजय मिळवला आहे. मेरठ आणि अलीगढ येथे महापौरपदी बसपचे उमेदवार निवडून आले आहेत. तसेच स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीतही बसपला चांगले यश मिळाले आहे.

तसंच ” आम्ही शहरी पालिकांच्या निवडणुका स्वतःच्या चिन्हावर लढवत विजय मिळवला. भाजपने याही निवडणुकांत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला. भाजपने जर असे केले नसते तर आमचे आणखीन महापौर विजयी झाले असते”. असंहीमायावती म्हणाल्या.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More