2 इराणी लुटारू गजाआड- 8 गुन्ह्यांची उकल, 1.64 लाखांचा माल हस्तगत – eNavakal
गुन्हे मुंबई

2 इराणी लुटारू गजाआड- 8 गुन्ह्यांची उकल, 1.64 लाखांचा माल हस्तगत

कल्याण- कल्याण परिमंडळ – 3 च्या अंतर्गत अँटी रॉबरी स्कॉडने दोघा कुख्यात इराणी लुटारूंच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाफर युसूफ जाफरी ऊर्फ चव्हाण (20) आणि जाफर गुलाब ईराणी ऊर्फ मुंडा (20) अशी या लुटारूंची नावे असून हे दोघेही कल्याण-कसारा मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशनजवळील इराणी कबिल्यात राहणारे आहेत.
 एकीकडे रोजच चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्यां सारख्या घटनांमुळे पोलीस मात्र हैराण झाले. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या रात्रभर विशेष गस्तही लावण्यात आलेल्या असतात. रोज जागोजागी नाकाबंदी करण्यात येते. तरीही चोऱ्यां-माऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट नागरिकांनी, दुकानदारांनी खबरदारी घ्यावी आणि सीसी टीव्ही कॅमेरे बसवावे, असा सल्ला पोलीस देत आहेत. त्यातच पादचारी, विशेषतः महिलांच्या गळ्यातील सोन्याचे अलंकार धूम स्टाईलने लांबविणाऱ्या लुटारूंनी तर पोलिस खात्यापुढे खुले आव्हान उभे केले आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ – 3 चे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॉबरी स्कॉड आव्हान स्वीकारून लुटारूंना हुडकून काढण्यासाठी जंग जंग पछाडत होते. त्याला चांगले यश आले आहे. या स्कॉडने पोलिसांना हवे असलेल्या जाफर जाफरी ऊर्फ चव्हाण आणि जाफर ईराणी ऊर्फ मुंडा या कुख्यात लुटारूंच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून मुसक्या बांधल्या. या दोघांकडून 12 महागडे मोबाईल व चोरीची मोटरसायकल, असा एकूण 1 लाख 64 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोघांनी डोंबिवली, नारपोली, उल्हासनगर, कोळसेवाडी, श्रीनगर, कापूरबावडी व टिळकनगर अशा पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातला होता. त्यांच्या विरोधात या सातही पोलिस ठाण्यांत जबरी चोरीचे 8 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले असल्याचे उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More
post-image
ट्रेंडिंग मनोरंजन

मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यातून आज दिलासादायक आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांचीही संख्या अधिक

मुंब –  राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे...
Read More