15 सप्टेंबरनंतर कामगार भरतीचा मुहूर्त – eNavakal
News मुंबई

15 सप्टेंबरनंतर कामगार भरतीचा मुहूर्त

मुंबई –  मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील 1388 कामगारांच्या पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. राज्य सरकारने या परीक्षेच्या निकालाला हिरवा कंदिल दाखवला असून त्याप्रमाणे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भरती प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. त्याप्रमाणे प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेतील कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल आया व स्मशान कामगार आदी पदांसाठी 1388कामगारांची भरती सरळ सेवेद्वारे भरण्याचा निर्णय घेऊन ऑनलाईनद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी एकूण 2 लाख 87 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु यापैकी परिक्षेला 2 लाख 42 हजार उमेदवार बसले होते. पण यासर्व उमेदवारांमधून 1 लाख 6 हजार 193 उमेदवार हे उत्तीर्ण झाले होते. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 50 गुणांची आवश्यकता होती. त्यामुळे 50 गुण आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून हे सर्व उमेदवार उत्तीर्ण झाले.

यामध्ये तब्बल 1500 उमेदवार हे 90 टक्क्क्यांपर्यंत गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. मात्र, उमेदवारांच्या भरतीची प्रक्रीया सुरु असतानाच भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत आवाज उठवून या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची जंत्रीच वाचवून दाखवली. जे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते, त्या प्रश्नांची उत्तरं बारावी शिकलेली मुले देऊ शकत नाहीत. त्यामुळे ही भरतीच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे या भरती प्रक्रीयेला स्थगिती दिली होती. याबाबत राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वी महापालिकेला पत्र पाठवून ही प्रक्रीया सुरु करण्याची सूचना केली. त्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबतचे निर्देश दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सरकारकडून सकारात्मक उत्तर आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी ही प्रक्रीया सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार भरती प्रक्रीया राबवणार्‍या महाऑनलाईन संस्थेला काम पुढे सुरु करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तीर्ण उमेदवारांची आरक्षण निहाय यादी बनवून अंतिम निकाल हा 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी हा निकाल एप्रिलपर्यंत जाहीर केला जाणार होता. परंतु स्थगितीमुळे हा निकाल लागण्यास तीन महिने विलंब झाला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More