परभणीत २३ हजार ४२१ विद्यार्थी देणार बारावीची परिक्षा – eNavakal
महाराष्ट्र शिक्षण

परभणीत २३ हजार ४२१ विद्यार्थी देणार बारावीची परिक्षा

परभणी – उच्च माध्यमिक बारावीच्या परिक्षेस बुधवार २१ फेब्रुवारी  पासून सुरुवात होणार आहे. जिल्हाभरातील ५५ परिक्षा केंद्रावर एकूण २३ हजार ४२१ विद्यार्थी बारावीची परिक्षा देणार आहेत.

भविष्यातील करियर निवडीच्या दृष्टीने बारावी परिक्षेला विशेष महत्व असते. वर्षभरापासून विद्यार्थी परिक्षेची तयारी करतात. बुधवार २१ फेब्रुवारी१८ ते मंगळवार २० मार्च१८ या दरम्यान बारावीच्या परिक्षा होणार आहेत. सकाळी ११ ते २ आणि दुपारी ३ ते ६ या सत्रात परिक्षा होणार आहेत. परिक्षा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाभरात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे एकूण २३ हजार ४२१ विद्यार्थी परिक्षेला बसलेले आहेत. त्यासाठी ५५ केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परभणी तालुक्यातील केंद्रावर २१ ,९ हजार ८५८ विद्यार्थी, पूर्णा तालुक्यातील पाच केंद्रावर १ हजार ५३७ विद्यार्थी, गंगाखेड तालुक्यातील आठ केंद्रावर २ हजार ८०५ विद्यार्थी, पालम तालुक्यातील चार केंद्रावर १ हजार ३६६ विद्यार्थी, सोनपेठ विभागात दोन केंद्रावर ६७२ विद्यार्थी, जिंतूर विभागात ९ केंद्रावर  २ हजार ९५८ विद्यार्थी, पाथरी तालुक्यात तीन केंद्रावर १ हजार ४२६ विद्यार्थी, मानवत विभागात दोन केंद्रावर  १ हजार ३३६ विद्यार्थी तर सेलू तालुक्यातील तीन केंद्रावर  १ हजार ४६३ विद्यार्थी बारावीची परिक्षा देणार आहेत.

प्रत्येक केंद्रावर एक या प्रमाणे ५५ बैठे पथक तैणात करण्यात आले आहे. या पथकात एक पथक प्रमुख व दोन सहकार्यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांचा समावेश असलेली ४४ भरारी पथके परभणी तालुक्यात राहणार आहेत. याच धर्तीवर इतर तालुक्यातही भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिक्षा काळात परिक्षा केंद्र व परिसरात १४४ कलम लावण्याची मागणी दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या कडे करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

मुंबईतही ‘ऑनलाईन लग्न’ वऱ्हाडी मंडळीही उपस्थित

मुंबई – लॉकडाऊन असताना आता मुंबईतही एका तरुणाचा ऑनलाईन लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली...
Read More
post-image
विदेश

इक्वाडोरच्या गल्लीत पडली 150 प्रेते, लोक त्यांच्याजवळ जायलाही घाबरतात

क्विटो – कोरोनाच्या महामारीने जगातील 200 देशांना विळखा घातला आहे. अमेरिकेपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर या लहानशा देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. या देशातील गुयाक्विल...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More
post-image
देश

कोरोनाग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या उंचावरून उडी...
Read More
post-image
देश

तेलंगणात नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

हैदराबाद – तेलंगणा राज्यातही कोरोनाचे संकट वाढले आहे. तिथे नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी सुदैवाने गेल्या 24 तासांमध्ये एकाची मृत्यू झालेला नाही....
Read More