-
मुंबई- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात हिंसक आंदोलने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता 1 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजातर्फेमुंबईतील आझाद मैदान येथे ‘जेलभरो’ आंदोलनाचा इशारा देणण्यात आला आहे. आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता कायदा व सुव्यवस्था राखून मोठ्या प्रमाणात जेलभरो करण्यात येणार असल्याचे परिपत्रकच मराठा क्रांतीमोर्चाने जारीकेले आहे. त्यामुळे हे आंदोलन आता अधिकच तीव्र होणार आहे.
-
मराठा क्रांती मोर्चाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाकरीता यापुर्वी 58 मुक मोर्चेे महाराष्ट्रभरात कायदा व सुव्यवस्था राखून शांततेत काढण्यात आले. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रत्येक वेळी निवेदन देऊन वेळोवेळी चर्चा देखील केली. परंतु गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत मुख्यमंत्री आणि सरकारने अद्यापपयर्र्ंत मराठा आरक्षणाकरीता कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. काल मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर काही लोकप्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षणाबाबत व महाराष्ट्रभरात आंदोलकांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात येतील असे आश्वासन दिले. मात्र हे गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारचा शासकीय लेखी आदेश किंवा परिपत्रक जारी केलेले नाही. म्हणून मराठा क्रांती मोर्चा-सकल मराठा समाजातर्फे बुधवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणात जेलभरो आंदोलन कायदा व सुव्यवस्था राखून करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
