९८ वर्षांच्या आजोबांनी १९ दिवसांत केली कोरोनावर मात – eNavakal
मुंबई

९८ वर्षांच्या आजोबांनी १९ दिवसांत केली कोरोनावर मात

मुंबई – देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. देशात ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एक ९८ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे  होऊन आपल्या घरी परतले आहेत.

वृद्ध व्यक्तीच कोरोनाचे जास्त शिकार ठरतात, हा संशोधकांचा अहवाल पुन्हा एकदा खोटा ठरला आहे. बोरिवली इथे राहणारे ९८ वर्षीय भंडारी यांना सर्दी पडसे झाले होते. तसेच थोडा खोकलाही होता. त्यामुळे त्यांना २० जुलैला बोरोवली येथील अपेक्स रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. ९८ वर्षीय आजोबा हे कोरोना संक्रमणाआधी म्हणजेच मार्च महिन्यापूर्वी एकदम तंदुरुस्त होते; न चुकता रोजचा घरातल्या घरात वॉक, संतुलित आहार व वाचन असा त्यांचा नित्यक्रम होता. अपेक्स हॉस्पिटलमध्ये १९ दिवस राहून ९८ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी मुंबईत वयाची शंभरी पूर्ण करणार्‍या एका कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तीवर यशस्वी उपचार केल्यानंतर, घरी पाठविण्यात आले होते. कोरोनापासून आपण वाचू शकतो, गरज आहे फक्त  निर्धाराची व कोरोनाला न घाबरता सामोरे जाण्याची, हाच संदेश या आजोबांनी आपल्या इच्छाशक्तीतून दिला आहे अशी माहिती डॉ. जिग्नेश पटेल यांनी दिली.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील वांद्रे इमारत दुर्घटनेत 16 जण जखमी

मुंबई – ऐन पावसाळ्यात वांद्रे येथील शेरली राजन रोड इमारत कोसळून इमारतीचे थेट दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळाले. यात 16 नागरिक जखमी झाले आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन

पुणे – पंढरपूरचे ५ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करणारे दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात काल रात्री साडे अकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ७५३, पुण्यात १,८२९ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांच्या पार

मुंबई – महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ८ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले. तर २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच ११ हजार ३९१ जणांनी कोरोनावर यशस्वी...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More