८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर – eNavakal
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला आहे. त्यांच्या कुटुंबालाही हालअपेष्ठा व उपासमार सहन करावी लागत आहे. मात्र सध्या परिवहन सेवा देखील थांबलेल्या असल्याने गावी परतण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. काही दिवसंपूर्वी हे चाकरमानी अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली लपून छपून पकडले गेल्याचे उघड झाले आहेत. तर अनेकजणांना चालत आपल्या गावाची वाट धरली आहे. अशाच एका 80 वर्षीय आजीने सलग तीन दिवस पायी चालत नवी मुंबई ते रायगडमधील म्हसळा हे अंतर गाठल्याची धक्कादायक तितकीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

कोरोनाच्या भितीने शहरी भागातील चाकरमानी गावाकडे पळू लागले आहेत. शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चाकरमानी घाबरले आहेत. त्यात संपर्कात येऊन या विषाणूची बाधा होत आहे. मात्र शहरात दाटीवाटीने राहावे लागत असल्याने चाकरमानी गावाकडे स्वच्छ वातावरण, मोकळा परिसर व स्वतःचे मोकळे घर अशा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची कारणे लक्षात घेत गावाकडे जाऊ लागले आहेत. केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केल्याने देशभरातील सरकारी व खासगी वाहतूक सेवा बंद आहेत. त्यामुळे मिळेल त्या साधनाने अथवा पायी चालत स्वतःचे गाव गाठण्यात येत आहे. मुंबईत राहणार्‍या मात्र कामानिमित्त नवी मुंबईत असणाऱ्या केरीबाई धर्मा पाटील या 80 वर्षीय आजीने नेरुळ, नवी मुंबई येथून पायी चालत म्हसळा तालुक्यातील मेंदडी गाव गाठण्याचा असाच निश्चय केला आणि तो प्रत्यक्षात आणला देखील.
2 एप्रिल रोजी या आजीबाई म्हसळा दिघी नाक्यावर पोहोचल्या, तेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार समोर आला. या आजींची विचारपूस करून पोलिसांचव देखील हृदय द्रवले. यानंतर दिघी नाक्यावर कार्यरत असणारे पोलीस समर्थ सांगले यांनी माणुसकीचे दर्शन घडवत स्वखर्चाने या आजीबाईंना जीवनावश्यक वस्तू दिल्या. तसेच पुढील सर्व माहिती घेऊन त्यांना त्यांच्या गावी म्हणजेच मेंदडी येथे पोलीस गाडीतून सोडले. या ८० वर्षीय आजीबाईंच्या हिमातील दाद देत पोलीसांच्या माणुसकीचे देखील सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लॉकडाउन 4.0 : आता पुढे काय करणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या चारही टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More