७ वर्षीय मुलाच्या बॅगेत साडेसहा लाखांची रोकड – eNavakal
महाराष्ट्र

७ वर्षीय मुलाच्या बॅगेत साडेसहा लाखांची रोकड

वसई – 7 वर्षीय मुलाच्या बॅगेत वैतरणा रेल्वे स्थानकात तब्बल सहा लाख 48 हजार 640 रुपये सापडले आहेत. रात्री पावणे नऊ वाजता हा प्रकार उघड झाला. चौकशीनंतर हे पैसे घरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

वैतरणा रेल्वे स्थानकात सुनसान असताना हा मुलगा पाठिवर बॅग अडकवून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वेची वाट पाहत होता. त्याचवेळी वैतरणा येथील तुषार पाटील हे विरारला नाईट ड्युटीसाठी जात होते. मुलाचा त्यांना संशय आला त्यांनी त्याची बॅग तपासली असता त्यामध्ये चक्‍क नोटांची बंडले दिसली. हा मुलगा नालासोपारा येथील अन्सारीनगर येथे राहतो. रेल्वे पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता तो घरातील ही रक्‍कम घेऊन निघाला होता. त्याचे वडील रानबीर अन्सारी यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More