५७ लाखांचा चुना लावणाऱ्या ‘कोळपेला’ ५ दिवस कोठडी – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक राजकीय

५७ लाखांचा चुना लावणाऱ्या ‘कोळपेला’ ५ दिवस कोठडी

नांदेड – नांदेडमधील जनतेला कोळपे पाटील मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या माध्यमातून 57 लाख 58 हजार 750 रुपयांचा चुना लावणाऱ्या श्रीधर कोळपेला पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

सन 2017 मध्ये निवघा ता. हदगाव येथील डॉ. विनोदकुमार अग्रवाल यांनी कोळपे मल्टीस्टेट सोसायटीविरुध्द तक्रार दिली होती. की त्यांची कोळपे कंपनीने 11 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकीचा प्रकार सन 2013 मध्ये घडला होता. हदगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचा तपास नांदेड जिल्ह्यातील आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला. दरम्यान श्रीधर उध्दवराव कोळपेला औसा न्यायालयाने अशाच एका फसवणूक प्रकरणात तुरुंगात पाठविले होते. त्या प्रकरणातील फसवणुकीची रक्कम 50 लाख रुपये भरावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यास दहा दिवसाच्या जामीनवर बाहेर सोडले होते. श्रीधर कोळपेने 50 लाखपैकी 10 लाख रुपये भरले त्यामुळे त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर श्रीधर कोळपेने नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला. नांदेडच्या जिल्हा न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. दरम्यान पैसे न भरल्यामुळे श्रीधर कोळपेला पुन्हा लातूरच्या तुरुंगात जावे लागले.

नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी येथील एमपीआयडी न्यायालयाकडून हस्तांतरण वारंटवर श्रीधर कोपळेला लातूरच्या तुरुंगातून आपल्या ताब्यात घेतले. नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कत्ते, पोलीस उपनिरीक्षक सय्यद शरफोद्दीन, पोलीस कर्मचारी संभाजी शिवभगत, दर्शन यादव यांनी श्रीधर कोळपेला नांदेडच्या जिल्हा न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी श्रीधर कोळपेने नांदेडमध्ये जवळपास शंभर, दिडशे लोकांना फसविले आसून फसवणुकीचा आकडा  57 लाख 58 हजार 750 आहे.  तरी हा आकडा पुढे वाढण्याची शक्यता आहे, असा युक्तीवाद केला. यावर न्या.खरात यांनी श्रीधर कोळपेला पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More