५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं! रितेश देशमुखची मोदींवर टीका – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं! रितेश देशमुखची मोदींवर टीका

लातूर – ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं, असं म्हणत अभिनेता रितेश देशमुख याने लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे. रितेश देशमुख याने लातूरमधील काँग्रेसच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदींच्या ५६ इंच छाती या मुद्द्याची खिल्ली उडवताना ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं, असं त्यांने म्हटलं आहे. रितेशच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मला प्रियंका गांधींचं वाक्य आठवतं ते म्हणतात, देश चालवायला ५६ इंच छाती नव्हे तर एक ह्रदय लागतं, चांगलं मन लागतं. ५६ इंचाची छाती म्हणजे केवढी मोठी छाती असणार असा विचार मी करत होतो, अहो, ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं, असं म्हणत रितेशने  पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलाच टोला लगावला. रितेश म्हणाला, केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत्याच बढाया मारतात, प्रत्यक्षात ते ज्या गोष्टींचा खुबीने वापर करीत आहेत त्या सर्व काँग्रेसची देणं आहे. आज आपण फेसबूक, ट्विटर वापरतो त्यासाठी लागणारा काॅम्प्युटर आणि मोबाईल ही काँग्रेसची देण आहे. काँग्रेसने याआधी काहीही केलं नाही मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपणच सर्वकाही करतो आहोत, असे मोदींना वाटते. मात्र, भारताला स्वातंत्र मिळाले हे देखील काँग्रेसचीच देणं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावं, असे रितेशने म्हटले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
विदेश

श्रीलंकेत चर्च, हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील पाच चर्च आणि तीन फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला आहे. या हल्ल्यात ८० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले...
Read More
post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More